टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटर सारख्या मोठ्या कंपन्यांचे सीईओ इलॉन मस्क यांनी मंगळवारी ट्वीटरमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल केला. मस्क यांनी ट्विटरचा लोगो रातोरात बदलला. त्यांनी ट्विटरच्या ब्लू बर्डच्या जागी श्वानाचं चित्र लोगो लावला. त्यांनी अचानक ट्विटरचा लोगो रातोरात बदलून सर्वांना आश्चर्यचकित केलं. काही लोकांना त्यांचा निर्णय आवडला, तर काही लोकांना ट्विटरचा हा लोगो आवडला नाही. लोकांना काही समजण्याआधीच इलॉन मस्क यांना मोठा झटका बसलाय.
ट्विटरचा लोगो बदलताच इलॉन मस्क यांना मोठा धक्का बसला आहे. ४ एप्रिल रोजी इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलला, त्यानंतर ट्विटरच्या ब्लू बर्डची जागा श्वानानं घेतली. या निर्णयानंतर टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.
मस्क यांची प्रमुख कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. टेस्ला शेअर्स तुफान आपटले. तर टेस्लाच्या शेअर्समध्ये आजही घसरण दिसून आले. शेअर्समध्ये सतत होत असलेल्या घसरणीचा परिणाम मस्क यांच्या नेट वर्थवर झाला आहे.नेटवर्थवर परिणामइलॉन मस्क यांच्या नेटवर्थमध्ये काल ९ अब्ज डॉलर्सपर्यंत घसरण झाली. बुधवारी यात आणखी घसरण झाली. दोन दिवसांमध्ये त्यांना तब्बल ८,५४,६४,६०,००,००० रुपयांचा फटका बसला. जेव्हगा टेस्लाच्या प्रोडक्शन आणि विक्रीची आकडेवारी जाहीर केली त्यावेळी टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाली. फोर्ब्स रिअल टाईम बिलेनिअर इंडेक्सनुसार मस्क यांचं नेटवर्थ १९२.८ अब्ज डॉलर्स आहे. ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. हेही वाचा - ट्विटरचा लोगो बदलला, मस्क बुडाले; मात्र Dogecoin ची किंमत एका फटक्यात २० टक्क्यांनी वाढली