Lokmat Money > बिझनेस न्यूज > टेस्लाची लवकरच भारतात एन्ट्री? इलाॅन मस्क यांच्या भूमिकेत बदल, भारतात उत्पादनाची याेजना

टेस्लाची लवकरच भारतात एन्ट्री? इलाॅन मस्क यांच्या भूमिकेत बदल, भारतात उत्पादनाची याेजना

मस्क यांची भूमिका बदलली असून, ते भारतात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी मस्क यांनी आधीच्या भूमिकेत लवचिकता घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 01:46 PM2023-05-19T13:46:01+5:302023-05-19T13:46:32+5:30

मस्क यांची भूमिका बदलली असून, ते भारतात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी मस्क यांनी आधीच्या भूमिकेत लवचिकता घेतली आहे.

Tesla entry in India soon? Elon Musk's role changes, plans to manufacture in India | टेस्लाची लवकरच भारतात एन्ट्री? इलाॅन मस्क यांच्या भूमिकेत बदल, भारतात उत्पादनाची याेजना

टेस्लाची लवकरच भारतात एन्ट्री? इलाॅन मस्क यांच्या भूमिकेत बदल, भारतात उत्पादनाची याेजना

नवी दिल्ली : इलाॅन मस्क यांची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी ‘टेस्ला’ भारतात प्रवेश करू शकते.  कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून, भारतात कार उत्पादन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मस्क यांची भूमिका बदलली असून, ते भारतात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी मस्क यांनी आधीच्या भूमिकेत लवचिकता घेतली आहे.

यासंदर्भात सरकार किंवा टेस्लाकडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार, भारतात आलेल्या टेस्लाच्या टीमने उत्पादनासाठी एक याेजना आखली आहे. प्रमुख मंत्रालयांसाेबतच पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांसाेबत टेस्लाचे अधिकारी चर्चा करीत आहेत.  

 टेस्लाने साधला संपर्क 
सरकार देशांतर्गत उत्पादनाला चालना देत आहे. त्यामुळे आयात शुल्कात सवलत देण्याची मागणी फेटाळली हाेती. ते हाच प्रस्ताव घेऊन येत आहेत अथवा नवा, याबाबत माहिती नाही, असे नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने सांगितले.

n४० हजार डॉलर व त्यापेक्षा अधिक किमतीच्या पूर्णपणे तयार गाड्यांवर भारतात १०० टक्के आयात शुल्क आहे. ते ४० टक्के करण्याची टेस्लाची प्रमुख मागणी हाेती. कंपनीच्या गाड्यांना लक्झरीऐवजी इलेक्ट्रिक वाहन म्हणून गृहीत धरण्याची टेस्लाची भूमिका हाेती. मात्र, सरकारने त्यास नकार दिला हाेता. 

मस्क यांची भूमिका
भारतात गाड्यांचे उत्पादन करणार असल्यास सवलती देऊ, अशी सरकारची भूमिका हाेती. मात्र, भारतात सर्वप्रथम गाड्यांच्या विक्रीला परवानगी देण्याच्या भूमिकेवर मस्क ठाम हाेते.

कशामुळे बदलली?
भारतात ॲपलच्या उत्पादनाला यश मिळाले. मस्क यांची मागणी वेगळ्या पद्धतीने पूर्ण हाेऊ शकते. देशांतर्गत उत्पादनासाठी आवश्यक सुट्या भागांच्या आयातीवर सवलत देता येईल, असे अधिकारी म्हणतात.

Web Title: Tesla entry in India soon? Elon Musk's role changes, plans to manufacture in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.