Lokmat Money > बिझनेस न्यूज > टेस्लाच्या CFO पदी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती!

टेस्लाच्या CFO पदी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती!

टेस्लाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की, आतापासून केवळ वैभव तनेजा कंपनीच्या आर्थिक बाबींचे प्रमुख असतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 10:28 PM2023-08-07T22:28:21+5:302023-08-07T22:29:27+5:30

टेस्लाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की, आतापासून केवळ वैभव तनेजा कंपनीच्या आर्थिक बाबींचे प्रमुख असतील.

Tesla gets new Indian-origin CFO Vaibhav Taneja  | टेस्लाच्या CFO पदी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती!

टेस्लाच्या CFO पदी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती!

दिग्गज अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी टेस्लाने भारतीय वंशाच्या व्यक्तीची नवीन CFO म्हणजेच मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. वैभव तनेजा असे या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव असून ते टेस्लामध्ये मुख्य लेखा अधिकारी (CAO) ची जबाबदारी सांभाळत आहेत. टेस्लाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की, आतापासून केवळ वैभव तनेजा कंपनीच्या आर्थिक बाबींचे प्रमुख असतील.

टेस्लाचे वित्त प्रमुख जॅकरी किर्कहॉर्न यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर सोमवारी बाजार उघडल्यानंतर कंपनीने ४५ वर्षीय वैभव तनेजा यांना नवीन सीएफओ बनवल्याची माहिती दिली. याआधी जॅकरी किर्कहॉर्न हे टेस्लाचे मास्टर ऑफ कॉईन आणि फायनान्स चीफ म्हणून गेली ४ वर्षे जबाबदारी सांभाळत होते. जॅकरी किर्कहॉर्न यांची टेस्लामधील कारकीर्द १३ वर्षांची राहिली आहे. राजीनामा दिल्यानंतर आपल्या निवदेनात जॅकरी किर्कहॉर्न म्हणाले की, "टेस्लामध्ये काम करणे हा एक अनोखा अनुभव होता. मी कंपनीत केलेल्या सर्व कामांचा मला अभिमान आहे. मी येथील कर्मचाऱ्यांचे आभार मानू इच्छितो की, जवळजवळ अशक्य वाटणारे काम आम्ही पूर्ण केले आहे."

दरम्यान, जॅकरी किर्कहॉर्न यांची जागा घेणारे भारतीय वंशाचे वैभव तनेजा मार्च २०१६ पासून टेस्लामध्ये काम करत आहेत. ते यापूर्वी सोलारसिटी कॉर्पोरेशन कंपनीत वित्त आणि खात्यांचे काम पाहत होते. मार्च २०१६ मध्ये टेस्लाने ही कंपनी ताब्यात घेतली आणि वैभव तनेजा टेस्लाचे कर्मचारी झाले. २०१७ मध्ये, कंपनीने त्यांना सहाय्यक कॉर्पोरेट कंट्रोलर म्हणून आणि मे २०१८ मध्ये कॉर्पोरेट कंट्रोलर म्हणून पदोन्नती दिली. वैभव तनेजा हे मार्च २०१९ पासून टेस्लाचे मुख्य लेखा अधिकारी आहेत. यापूर्वी वैभव तनेजा 'प्राइस वॉटर हाऊस कूपर्स'मध्ये नोकरीला होते.
 

Web Title: Tesla gets new Indian-origin CFO Vaibhav Taneja 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.