Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुजरातमध्ये सुरू होणार Tesla चा पहिला कारखाना, लवकरच होणार अधिकृत घोषणा...

गुजरातमध्ये सुरू होणार Tesla चा पहिला कारखाना, लवकरच होणार अधिकृत घोषणा...

जानेवारी महिन्यात इलॉन मस्क भारतात येऊन याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 07:32 PM2023-12-28T19:32:48+5:302023-12-28T19:34:41+5:30

जानेवारी महिन्यात इलॉन मस्क भारतात येऊन याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

Tesla Plant In Gujarat: Tesla's first factory to open in Gujarat, official announcement to be made soon | गुजरातमध्ये सुरू होणार Tesla चा पहिला कारखाना, लवकरच होणार अधिकृत घोषणा...

गुजरातमध्ये सुरू होणार Tesla चा पहिला कारखाना, लवकरच होणार अधिकृत घोषणा...

Tesla Plant In Gujarat: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांच्या मलकिची Tesla कंपनी अनेक दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत येण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक दिवसांपासून मस्क यांना भारत सरकारशी अद्याप समन्वय राखता आला नव्हता. टेस्लाला जे हवे, ते भारत सरकारला मान्य नव्हते आणि भारत सरकारला जे हवे, ते टेस्लाला मान्य नव्हते. 

मात्र, आता टेस्ला लवकरच भारतात आपला व्यवसाय सुरू करणार असून त्यासाठी गुजरातमध्ये आपला पहिला कारखाना सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टेस्ला भारतात प्लांट उभारणार असल्याची घोषणा जानेवारीमध्ये व्हायब्रंट गुजरात समिटदरम्यान केली जाऊ शकते. या कार्यक्रमात कंपनीचे सीईओ इलॉन मस्क उपस्थित राहू शकतात.

रिपोर्टनुसार, राज्य सरकारने टेस्लाचा कारखाना उभारण्यासाठी साणंद, बेचराजी आणि धोलेरा, ही ठिकाणे सुचवली आहेत. यापूर्वी टेस्ला गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये EV प्लांट उभारण्याचा विचार करत होती. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, टेस्ला सुरुवातीला सुमारे $ 2 अब्ज गुंतवण्याची योजना आखत आहे. येत्या काही दिवसांत याबाबत स्पष्ट माहिती मिळेल.

Web Title: Tesla Plant In Gujarat: Tesla's first factory to open in Gujarat, official announcement to be made soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.