नवी दिल्ली - अमेरिकेची आघाडीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाभारतात आपला प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्सुक असून महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात यापैकी एका राज्यात कंपनीचा प्रकल्प उभा राहण्याची शक्यता आहे. प्रकल्प कोठे स्थापन करायचा याचा शोध घेण्यासाठी कंपनीचे एक पथक या महिन्याच्या अखेरीस भारतात येणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मंदावत असून अमेरिका व चीनच्या बाजारात टेस्लास मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. मागणी घटल्यामुळे पहिल्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत घसरण पाहायला मिळाली आहे. (वृत्तसंस्था)
३ अब्ज डॉलर्सची होणार गुंतवणूक?
एका वृत्तानुसार, प्रकल्पासाठी आधीच वाहन उद्योग असणाऱ्या राज्यांना टेस्लाचे पथक प्राधान्य देणार आहे. यात महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या प्रकल्पात टेस्लाकडून ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.