सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
गतवर्षीच्या तुलनेत केंद्र सरकारने डाळींच्या किमान हमी भावात ३३ टक्क्यांची वाढ केली, तरीही भारतात डाळींचे भाव अचानक का वाढले, याची कारणे शोधतांना केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून वेगळीच उद्बोधक माहिती हाती आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतात १९७0/७१ साली २.२५ कोटी हेक्टर क्षेत्रात डाळींचे उत्पादन होत होते. २0१४/१५ साली ते फक्त २.४७ कोटी हेक्टरपर्यंत पोहोचले. म्हणजेच ४५ वर्षात ते फक्त २२ कोटी हेक्टरने वाढले.
भारतात डाळींच्या उत्पादनात शेतकऱ्याला पुरेसा आर्थिक नफा होत नाही. या पिकाची शेती परवडत नाही हे हे यामागचे मुख्य कारण. शरद पवार कृषीमंत्री असतांना युपीए सरकारने २0१0/११ साली तूर, उडद व मूग डाळीला प्रति क्विंटल २९00 ते ३१७0 पर्यंत किमान हमी भाव दिला. कापणीच्या काळात या पिकांना पहिली दोन वर्षे ५00 रूपये प्रति क्विंटल रूपये बोनसही दिला. २0११ पासून २0१४/१५ चार वर्षात हा भाव ४३५0 ते ४६00 रूपये क्विंटलपर्यंत वाढवत नेला. तरीही डाळींच्या उत्पादनात समाधानकारक वाढ झाली नाही.
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर २0१५/१६ कृषी वर्षासाठी तूर व उडीद डाळीला प्रति क्विंटल ४४२५ रूपये तर मूग डाळीला ४६५0 हमी भाव व २00 रूपयांचा प्रति क्विंटल बोनस जाहीर करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ ३३ टक्के आहे. तरीही भारतात तुटवडा पूर्वीपेक्षा अधिक आहे.
तूर, उडद व मुगावर पडणारे विविध प्रकारचे रोग, दर हेक्टरी उत्पादनाचे अल्प प्रमाण, उत्पादन खर्च व बाजारपेठेत डाळींच्या विक्रीची किंमत यात सुसूत्रता नसल्यामुळे उत्तर व पूर्व भारतातल्या ८ राज्यांमध्ये डाळींच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. गेल्या चार दशकात भारताची लोकसंख्येच्या प्रमाणात डाळींची मागणीही वाढत गेली मात्र उत्पादन काही त्याप्रमाणात वाढले नाही.
भारतात उत्तर व पूर्वेकडील राज्यांमधे पूर्वी डाळींच्या उत्पादनाखाली असलेले हरयाणा १0 लाख, पंजाब ४ लाख, उत्तरप्रदेश २.५0 लाख, बिहार ३ लाख, राजस्थान २ लाख, पश्चिम बंगाल ४ लाख, जम्मू काश्मीर ५0 हजार हेक्टर, असे जवळपास २५ लाख हेक्टर क्षेत्र गेल्या काही वर्षात घटले आहे. दक्षिणेकडील राज्यात डाळ उत्पादनाचे प्रमाण थोडे वाढले मात्र त्यातले बहुतांश उत्पादन कमी कसाच्या, फारशी उत्पादकता नसलेल्या, पडिक व सिंचनाचा अभाव असलेल्या जमिनींवर होत असल्याने बाजारपेठेत या डाळींना चांगला भाव मिळत नाही. ज्वारीचा किमान हमी भाव सध्या १५९0 रूपये प्रतिक्विंटल आहे. ज्वारीच्या उत्पादनात शेतकऱ्याला प्रति हेक्टर ३८१६0 रूपये मिळतात. तूर, उडद, मूगदाळीचा हमी भाव सरासरी ४४२५ प्रति क्विंटल असला तरी शेतकऱ्याला त्याचे प्रति हेक्टरी ३३६३0 रूपये म्हणजे ज्वारीपेक्षा ४५00 रूपये प्रति हेक्टरी कमी मिळतात. डाळीचे उत्पादन दर हेक्टरी सरासरी ७६0 क्विंटल इतकेच आहे, हे त्याचे कारण. याखेरीज विविध प्रकारच्या रोगांपासून डाळीच्या पिकाला वाचवण्यासाठी अतोनात मेहनत घ्यावी लागते. त्यापेक्षा तेलबिया, गहू, तांदूळ इत्यादी अन्नधान्याच्या उत्पादनात तुलनेने कमी कष्टात शेतकऱ्याला पूर्वीपेक्षा अधिक पैसे सध्या मिळतात.
े पंजाब, हरयाणा व हिमाचल प्रदेशात डाळींचे उत्पादन जवळपास बंद झाले आहे. मार्चमधे पडलेल्या अवकाळी पावसामुळे चनाडाळीचे पीकही मोठ्या प्रमाणावर उध्वस्त झाले. गतवर्षीच्या तुलनेत तर ते २0 टक्क्यांवर आले आहे.
शेतकऱ्यांची डाळ उत्पादनाकडे पाठ
गतवर्षीच्या तुलनेत केंद्र सरकारने डाळींच्या किमान हमी भावात ३३ टक्क्यांची वाढ केली, तरीही भारतात डाळींचे भाव अचानक का वाढले
By admin | Published: October 27, 2015 11:21 PM2015-10-27T23:21:27+5:302015-10-27T23:21:27+5:30