Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३० वर्षांचा अब्जाधीश राताेरात झाला कंगाल, १४.६ अब्ज डाॅलर्स संपत्ती गमावली

३० वर्षांचा अब्जाधीश राताेरात झाला कंगाल, १४.६ अब्ज डाॅलर्स संपत्ती गमावली

Business : वयाच्या तिशीच्या आत एक तरुण अब्जाधीश हाेताे. मात्र, एका रात्रीतून ताे अक्षरश: कंगाल हाेताे. एफटीएक्सचे सहसंस्थापक सॅम बॅंकमॅन फ्रायड यांच्यावर हा ओढावला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 09:11 AM2022-11-13T09:11:34+5:302022-11-13T09:12:05+5:30

Business : वयाच्या तिशीच्या आत एक तरुण अब्जाधीश हाेताे. मात्र, एका रात्रीतून ताे अक्षरश: कंगाल हाेताे. एफटीएक्सचे सहसंस्थापक सॅम बॅंकमॅन फ्रायड यांच्यावर हा ओढावला आहे.

The 30-year-old billionaire became destitute overnight, losing $14.6 billion in wealth | ३० वर्षांचा अब्जाधीश राताेरात झाला कंगाल, १४.६ अब्ज डाॅलर्स संपत्ती गमावली

३० वर्षांचा अब्जाधीश राताेरात झाला कंगाल, १४.६ अब्ज डाॅलर्स संपत्ती गमावली

नवी दिल्ली : वयाच्या तिशीच्या आत एक तरुण अब्जाधीश हाेताे. मात्र, एका रात्रीतून ताे अक्षरश: कंगाल हाेताे. एफटीएक्सचे सहसंस्थापक सॅम बॅंकमॅन फ्रायड यांच्यावर हा ओढावला आहे. त्यांची नेटवर्थ तब्बल १५ अब्ज डाॅलर्स एवढी हाेती. मात्र, एका रात्रीत ती जवळपास शून्य झाली आहे. एखाद्या अब्जाधीशाच्या संपत्तीत एका दिवसात झालेली ही सर्वांत माेठी घट आहे.
एफटीएक्स ही एक क्रिप्टाेकरन्सी एक्स्चेंज फर्म आहे. ती बिनान्स ही प्रतिस्पर्धी कंपनी विकत घेत असल्याचे सॅम यांनी जाहीर केले आणि त्यांच्या आयुष्यात माेठे वादळ आले. या घाेषणेपूर्वी त्यांची संपत्ती १५.२ अब्ज डाॅलर्स एवढी हाेती. काही तासांमध्येच त्यात १४.६ अब्ज डाॅलर्स एवढी घट झाली. बिनान्स ही जगातील माेठ्या क्रिप्टाेकरन्सी प्लॅटफाॅर्मपैकी एक आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The 30-year-old billionaire became destitute overnight, losing $14.6 billion in wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.