अबू धाबी नॅशनल एनर्जी कंपनी पीजेएससी (TAQA) ही गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाच्या कंपनीत मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. TAQA ही गौतम अदानी यांच्या विजे संदर्भातील उद्योगात गुंतवणूक करू सकते. जो थर्मल प्रोडक्शनपासून ते क्लीन एनर्जी आणि ग्रीन हायड्रोजनपर्यंतच्या विवीध झोनमध्ये पसरलेला आहे. द इकोनॉमिक टाइम्समधील वृत्तानुसार, TAQA समूहाची कंपनी एखाद्या सिंगल युनिटमध्ये 1.5-2.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्यास तयार आहे. ही अबू धाबी सिक्योरिटीज एक्सचेन्जवर लिस्टेड TAQA कंपनी असून इंटरनॅशनल एनर्जी आणि वॉटर कंपनी आहे.
ADX वर TAQA हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्टॉक आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, कंपनी प्राथमिक गुंतवणूक आणि प्रमोटर पारिवारिक संस्थांकडून शेअर्सची सेंकडरी खरीदीच्या संयोजनाच्या माध्यमाने अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये 19.9 टक्क्यांपर्यंत हिस्सेदारीची खरेदी करण्यास उत्सुक आहे. सध्या अदानी एनर्जी सोल्यूशन्सचे व्हॅल्यूएशन 91,660 कोटी रुपये एवढे आहे. यात प्रमोटर्सकडे 68.28 टक्के हिस्सेदारी आहे. सध्याच्या किंमतीवर जवळपास 20 टक्के हिस्सेदारीचा अर्थ 18,240 कोटी रुपेय (2.19 अब्ज डॉलर) ची गुंतवणूक होईल.
प्रोजोक्ट्सवर सोबत काम करण्यावर विचार -माध्यमांतील वृत्तांनुसार, दोन्ही पक्ष, नियोजनबद्ध पद्धतीने उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियातील प्रकल्पांवर एकत्रित काम करण्याचा विचार करत आहेत. 2005 मध्ये स्थापन झालेल्या TAQA ने वीज उत्पादन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशन अॅसेट बरोबरच अपस्ट्रीम आणि मिडस्ट्रीम ऑईल आणि गॅस ऑपरेशनमध्ये गुंतवणूक केली आहे.
कंपनीची संपत्ती संयुक्त अरब अमीरात, सऊदी अरेबिया, कॅनडा, घाना, भारत, इराक, मोरक्को, ओमान, नेदरलँड, यूके आणि अमेरिकेत पसरलेली आहे. भारतीय वीज निर्मिती क्षेत्रातील एक मुख्य कंपनी असलेल्या अदानी समूहासोबत भागिदारी करून TAQA वेगाने विकसित होत असलेल्या बाजारात मजबूत पकड निर्माण करू शकते.