Join us

सोने तारण ठेवून कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले! तब्बल २० टक्क्यांनी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 11:55 AM

क्रिसिल रेटिंग्जच्या अहवालानुसार, जून महिन्यात गोल्ड लोनची मागणी मे महिन्याच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढली आहे.

नवी दिल्ली : भारतीयांचे सोन्याचे आकर्षण कमी झालेले नाही. किमती वाढल्या तरी सोने खरेदीत कधीही खंड पडला नाही. सोन्याच्या किमती वाढल्याचा फायदा विक्रेत्यांना होत आहे त्याप्रमाणेच सोने तारण कर्ज देणाऱ्या कंपन्यांनाही होत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडून सोन्यावर कर्ज काढणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे.

क्रिसिल रेटिंग्जच्या अहवालानुसार, जून महिन्यात गोल्ड लोनची मागणी मे महिन्याच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढली आहे. या अहवालानुसार जून २०२४ मध्ये देण्यात आलेले सोने तारण कर्ज मागील तिमाहीतील प्रत्येक महिन्यात दिलेल्या कर्जाच्या तुलनेत १२ टक्के अधिक आहे. सोन्याची शुद्धता तपासून त्यावर कर्ज दिले जाते. यावरील व्याजाचे दर बँकांच्या कर्जाच्या दरापेक्षा कमी असते.  

टॅग्स :सोनंव्यवसाय