Adani Group News: अदानी समुहाच्या लिस्टेड कंपन्यांपैकी एक असलेल्या अदानी पॉवर लिमिटेडबाबत मोठी बातमी आली आहे. दोन प्रवर्तक आर्डोर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग आणि इमर्जिंग मार्केट इन्व्हेस्टमेंट यांनी 2.06 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. बीएसई फाइलिंगनुसार, स्टेकची ही खरेदी 26 सप्टेंबर ते 16 नोव्हेंबर 2023 दरम्यान झाली. दरम्यान, सोमवारी कंपनीचे शेअर्स बीएसईमध्ये 387 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते.
यापूर्वी, अदानी पॉवरमध्ये प्रवर्तकांची भागीदारी 69.09 टक्के होती. त्यांच्याकडे 2,66,46,59,567 शेअर्स होते. या अधिग्रहणानंतर, अदानी पॉवरमधील प्रवर्तकांची भागीदारी 71.14 टक्के झाली आहे. म्हणजेच आता त्यांच्याकडे कंपनीचे 2,74,39,30,967 शेअर्स आहेत.
अदानी पॉवरने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय की, आर्डोर इन्व्हेस्टमेंट होल्डिंगनं (Ardor Investment Holding) 26 सप्टेंबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान 7,42,71,400 शेअर्स खरेदी केले आहेत. तर, इमर्जिंग मार्केट इन्व्हेस्टमेंट डीएमसीसीनं (DMCC) 29 सप्टेंबर 2023 रोजी 50,00,000 शेअर्स खरेदी केले आहेत. गेल्या एका महिन्यात हा शेअर 14.6 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी हा स्टॉक विकत घेतला आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली त्यांनी आतापर्यंत 56 टक्के नफा कमावला आहे.
सप्टेंबर तिमाही कशी होती?
अदानी पॉवरनं नुकतेच तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांचा नफा 6549 कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत तो 847.41 टक्के अधिक आहे. कंपनीला याच तिमाहीत गेल्या आर्थिक वर्षात 696 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)