Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आजवरचा सर्वाधिक निधी, जुने ट्रॅक बदलणार, पुलांची डागडुजी करणार रेल्वेसाठी केंद्राची तिजोरी खुली

आजवरचा सर्वाधिक निधी, जुने ट्रॅक बदलणार, पुलांची डागडुजी करणार रेल्वेसाठी केंद्राची तिजोरी खुली

सध्याच्या सुविधा उत्तम करणे, नव्या सुविधांचे निर्माण आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे यांवर रेल्वेचा भर असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 08:00 AM2024-07-25T08:00:56+5:302024-07-25T08:01:15+5:30

सध्याच्या सुविधा उत्तम करणे, नव्या सुविधांचे निर्माण आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे यांवर रेल्वेचा भर असणार आहे.

The central coffers opened for railways, which will replace old tracks, repair bridges, with the largest ever fund | आजवरचा सर्वाधिक निधी, जुने ट्रॅक बदलणार, पुलांची डागडुजी करणार रेल्वेसाठी केंद्राची तिजोरी खुली

आजवरचा सर्वाधिक निधी, जुने ट्रॅक बदलणार, पुलांची डागडुजी करणार रेल्वेसाठी केंद्राची तिजोरी खुली

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : या वर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी कोणताही नवी घोषणा करण्यात आली नसली तरी या खात्यासाठी सरकारने भरभरून निधी दिल्याचे दिसत आहे. अर्थसंकल्पात सरकारने आजवरच्या सर्वाधिक २,६२,२०० कोटी इतक्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केली आहे. २०२३-२४ मध्ये रेल्वेला २,४०,००० कोटी इतका होता.

सध्याच्या सुविधा उत्तम करणे, नव्या सुविधांचे निर्माण आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे यांवर रेल्वेचा भर असणार आहे. येत्या काळात अमृत भारत एक्स्प्रेससारख्या अधिक गाड्या चालवल्या जाऊ शकतात. १,०८,००० कोटींचा निधी जुने ट्रॅक बदलणे, सिग्नल यंत्रणा सुधारणे, कवच यंत्रणेची उभारणी आणि पुलांची डागडुजी, कामांसाठी देण्यात आला आहे. 

  • ६,१०८ स्थानकांवर वायफाय सुविधा सुरू करण्यात आली आहे
  • ६७३ कोटी प्रवाशांनी २०२३-२४ मध्ये रेल्वेने प्रवास केला. मागील वर्षाच्या तुलनेत यात ५.२ टक्के इतकी वाढ झाली आहे.
  • ४१,००० किलोमीटर लांब रेल्वेमार्गाच विद्युतीकरण २०१४ ते २०२४ या कालखंडात केले.
  • २४,४१३ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे विद्युतीकरण २०१४ पूर्वी करण्यात आले होते.
  • मागील १० वर्षात ३१,१८० किलोमीटरचे ट्रॅक बांधले. ट्रॅक देशभरात बांधण्यात आले. ट्रॅक बांधण्याचा वेग २०१४-१५ मध्ये प्रतिदिन ४ किमी इतका होता. हा वेग २०२३-२४ मध्ये १५ किलोमीटर प्रतिदिन इतका होता.

Web Title: The central coffers opened for railways, which will replace old tracks, repair bridges, with the largest ever fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.