Join us

चिनी बाजाराने दिला ४ लाख काेटी डाॅलरचा फटका; घसरगुंडीमुळे गुंतवणूकदारांचे पोळले हात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 1:14 PM

अर्थव्यवस्था घसरली, अंदाज चुकले

नवी दिल्ली: गुंतवणूकदारांनाचीनमध्ये मोठा फटका बसत आहे. २०२१ पासून चीनच्याशेअर बाजारातील घसरगुंडीमुळे गुंतवणूकदारांनी तब्बल चार लाख कोटी डॉलर गमावले आहेत. कोरोना काळात चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला. त्यातून अजूनही हा देश सावरलेला नाही. वास्तविक गेल्या वर्षी जगभरातील शेअर बाजारात तेजी राहिली. मात्र, चीनमधील शेअर बाजारांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. अमेरिकेच्या ‘एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इंडेक्स’मधील चीनच्या बाजारांची हिस्सेदारी ३१ डिसेंबर २०२३ रोजी घसरून २३.७७ टक्के झाली. ही निचांकी पातळी आहे.

अर्थव्यवस्था घसरली

अर्थव्यवस्थेतील घसरगुंडीमुळे विदेशी गुंतवणूकदार चीनमधील आपली गुंतवणूक सातत्याने काढून घेत आहेत. चीनमध्ये बेरोजगारी वाढली आहे. विदेशी कंपन्या चीनमधून गाशा गुंडाळत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्र संकटात आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तेथून पाय काढत आहेत. 

अंदाज चुकले

चीनचा इमर्जिंग मार्केट इंडेक्समध्ये समावेश करण्यात आला तेव्हा इंडेक्समधील चीनची हिस्सेदारी वाढून ४२ टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज हाेता. तथापि, तसे घडू शकलेले नाही. सप्टेंबर २०२० मध्ये ती वाढली. आता ती १५ टक्के घसरली आहे.

टॅग्स :चीनगुंतवणूकशेअर बाजार