Join us

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ची भरतेय तिजोरी, २.३२ ट्रिलियनपर्यंत पोहोचला प्रीमिअम कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 7:36 PM

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) तिजोरीत सातत्यानं वाढ होत आहे.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) तिजोरीत सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या आर्थिक वर्षात, एलायसीच्या प्रीमियम ठेवींमध्ये 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यानंतर एकूण प्रीमियम 1.99 ट्रिलियन वरून 2.32 ट्रिलियन रुपयांवर पोहोचला आहे. प्रीमियम संकलनाच्या बाबतीत, मार्च 2023 पर्यंत LIC चा बाजारातील हिस्सा 62.58 टक्के आहे.

लाइफ इन्शुरन्स कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, 1 एप्रिलपूर्वी नॉन-लिंक्ड पॉलिसींवरील करमाफीचा लाभ घेण्यासाठी अखेरच्या क्षणी खासगी कंपन्यांच्या ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे खासगी विमा कंपन्यांच्या प्रीमियममध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात एलआयसीनंतर एचडीएफसी लाइफ 18.83 टक्के, SBI लाइफ 16.22 टक्के आणि ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीचा 12.55 टक्के हिस्सा होता.

आर्थिक वर्ष 23 मध्ये, विमा कंपनीचा वैयक्तिक सिंगल प्रीमियम 3.30 टक्के आणि वैयक्तिक नॉन-सिंगल प्रीमियम 10 टक्क्यांनी वाढला, तर त्याचा ग्रुप सिंगल प्रीमियम 21.76 टक्क्यांनी वाढला असून तो 1,37,350.36 कोटींवरून 1,67,235 कोटी रुपयांवर  गेला.

टॅग्स :एलआयसीएसबीआयआयसीआयसीआय बँक