शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षी जबरदस्त रिटर्न देणार्या काही शेअर्समध्ये GKP प्रिंटिंगचा समावेश आहे. दरम्यान, कंपनीनं मोठे रिटर्न देऊन आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केल्यानंतर कंपनी आता शेअर होल्डर्सना बोनसही देणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा होईल. GKP प्रिंटिंगच्या संचालक मंडळाने 2:1 रेशोमध्ये बोनस जाहीर केला आहे. शेअर बाजाराला या बातमीची माहिती मिळताच, कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळी गाठली.
स्मॉल कॅप कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 2 शेअर्सवर एक शेअर बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 8 ऑगस्ट 2022 रोजी होणार असल्याची माहितीही कंपनीनं शेअर बाजाराला दिली.
कशी होती कामगिरी?
गेल्या एका महिन्याबद्दल सांगायचं झालं तर कंपनीच्या शेअरची किंमत 198.50 रुपयांवरून 256.25 रुपयांपर्यंत वाढली. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांना 27.46 टक्के रिटर्न्स मिळाले. त्याच वेळी, या वर्षाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास, कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 75.09 टक्क्यांची उसळी दिसून आली आहे. जर आपण वर्षभरापासून आतापर्यंतची तुलना केली तर शेअरची किंमत 612.68 टक्क्यांनी वाढली आहे.
शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 276 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची किमान पातळी 35.40 रुपये आहे. महाराष्ट्रात असलेल्या या कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकालही उत्साहवर्धक आहेत. कंपनीचे मार्केट कॅप 371 कोटी रुपये आहे.