Join us

ज्यांनी ChatGPT बनवलं त्या कंपनीवर दिवाळखोरीत जाण्याचा धोका, पाण्यासारखा खर्च होतोय पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 11:41 AM

ChatGPT विकसित करण्यास सुरुवात केल्यापासून कंपनीला दुप्पट नुकसान झालंय.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI च्या या युगात चॅट जीपीटीचा (ChatGPT)  बोलबाला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च झाल्यापासून, फास्टेस्ट ग्रोईंग अॅपच्या माध्यमातून यानं इतिहास रचला आहे. ChatGPT ओपनएआयने विकसित केले आहे. हे अॅप नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे. पण ते बनवणाऱ्या कंपनीची अवस्था मात्र वाईट आहे. 

अॅनालिटिक्स इंडिया मासिकाच्या अलीकडील अहवालात कंपनीच्या आर्थिक भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे. 2024 च्या अखेरीस OpenAI दिवाळखोरीत निघू शकते असे अहवालात म्हटलं आहे. अहवालानुसार, सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या संख्येने युझर्स या अॅपवर आले होते, परंतु अलीकडील काही महिन्यांत युझर्सची संख्या कमी होत आहे.

रोज ५.८० कोटींचा खर्चसॅम ऑल्टमनच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टुडिओ ओपनएआयसाठी ही चांगली बातमी नाही. रिपोर्टनुसार, कंपनीला चॅट जीपीटी वर मोठा खर्च करावा लागत आहे. OpenAI आपली AI सेवा चॅट जीपीटी चालवण्यासाठी दररोज 5.80 कोटी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे कंपनीला रोख रकमेचा सामना करावा लागतोय. चॅट जीपीटी 3.5 आणि जीपीटी-4 मॉनेटाईज झाले असले तरी कंपनी अजूनही पुरेसा महसूल मिळवू शकली नाही.

युझर्स झाले कमीचॅट जीपीटीबाबतचं युझर्सचं आकर्षण हळूहळू कमी होत आहे. अलीकडील काही महिन्यांत युझर्स हळूहळू कमी झाले आहेत. SimilarWeb च्या डेटानुसार, जुलैच्या अखेरीस, चॅट जीपीटीचे युझर्स आणखी कमी झाले आहेत. जुलै 2023 मध्ये, जूनच्या तुलनेत यात 12 टक्क्यांची घसरण झालीये. यामुळे चॅटजीपीटीचे युजर्स 1.7 अब्ज वरून 1.5 बिलियनवर आले आहेत.

दुप्पट तोटाओपनएआयची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. ओपन एआय अजूनही प्रॉफिटेबल नाही, परंतु तोटा दुप्पट झाला आहे. मे मध्ये चॅट जीपीटी विकसित करण्यास सुरुवात केल्यापासून, त्यांचं नुकसान दुप्पट होऊन 540 मिलियन डॉलर्स झालं आहे. मायक्रोसॉफ्टची OpenAI मध्ये 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक आहे.

का कमी होतायत युझर्सOpenAI साठी एपीआय एक समस्या बनले आहे. यापूर्वी अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना चॅटजीपीटी वापरण्यास सांगितलं होतं. आता त्यांनी OpenAI च्या एपीआयमध्ये एन्ट्री करण्यास सुरुवात केली आहे. यासह त्यांनी स्वतःचे चॅटबॉट्स बनवण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, अनेक ओपन सोर्स एलएलएम मॉडेल्स आहेत जी वापरण्यासाठी विनामूल्य आहेत.

टॅग्स :व्यवसायआर्टिफिशिअल इंटेलिजन्स