Join us

उत्तराधिकारी नसल्याने अखेर कंपनी विकणार! बाटलीबंद पाणी देणारी ‘बिसलेरी’ विक्रीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 12:17 PM

Bisleri: भारतात बाटलीबंद पाण्याच्या युगाची सुरुवात करणारे बिसलेरी इंटरनॅशनलचे संस्थापक रमेश चाैहान यांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : भारतात बाटलीबंद पाण्याच्या युगाची सुरुवात करणारे बिसलेरी इंटरनॅशनलचे संस्थापक रमेश चाैहान यांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. बिसलेरी या लाेकप्रिय नावाखाली त्यांनी या उद्याेगाची देशात सुरुवात केली हाेती. मात्र, त्यांची मुलगी व्यवसाय सांभाळण्यास तयार नसल्याने चाैहान यांनी हा निर्णय घेतला आहे. बिसलेरीच्या खरेदीसाठी टाटा कन्झ्युमर प्राॅडक्ट लिमिटेडसाेबत चर्चा सुरू असल्याची माहिती रमेश चाैहान यांनी स्वत: दिली आहे.सुमारे ७ हजार काेटी रुपयांमध्ये ‘बिसलेरी’ची ‘टाटा’ला विक्री केल्याची चर्चा सुरू झाली हाेती. त्यावर रमेश चाैहान यांनी सांगितले, की हाेय, आम्ही कंपनीची विक्री करीत आहाेत. ‘टाटा’सह इतरही काही कंपन्यांसाेबत चर्चा सुरू आहे. मात्र, अंतिम निर्णय काेणत्याच कंपनीसाेबत सध्या झालेला नाही. कंपनी विक्रीला काढण्यामागे काय कारण आहे, असे विचारले असता ८२ वर्षीय चाैहान म्हणाले, की काेणाला तरी कंपनी सांभाळावी लागेल. १९६५ मध्ये झाली हाेती सुरुवातबिसलेरीने सर्वप्रथम १९६५ मध्ये विक्री सुरू केली हाेती. ही इटलीचे फेलिस बिसलेरी यांची मूळ कंपनी हाेती. भारतात अपयशी ठरल्यानंतर रमेश चाैहान यांचे वडील जयंतीलाल चाैहान यांनी १९६९ मध्ये ती विकत घेतली हाेती. चाैहान यांनी तीन दशकांपूर्वी १९९३ मध्ये थम्स अप, गाेल्ड स्पाॅट, माझा, सिट्रा आणि लिम्का इत्यादी ब्रॅंडची काेका-काेला या कंपनीला विक्री केली हाेती.

म्हणून घेतला निर्णयn रमेश चाैहान यांची मुलगी जयंती या सध्या कंपनीच्या उपाध्यक्ष आहेत. n मात्र, त्यांनी हा व्यवसाय पुढे चालविण्यामध्ये रुची दाखविलेली नाही. उत्तराधिकारी नसल्यामुळे अखेर चाैहान यांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :व्यवसायपाणी