Join us  

वेदांतसोबतचा करार रद्द झाला! आता फॉक्सकॉनला भारतात चिप बनवण्यासाठी नवा भागीदार मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 9:40 PM

फॉक्सकॉन लवकरच भारतात आपला प्रोजेक्ट सुरू करणार आहे.

तैवानची फॉक्सकॉन कंपनी भारतात लवकरच प्रोजेक्ट सुरू करणार आहे. फॉक्सकॉन वेदांतासोबत भागीदारी करुन प्रोजेक्ट सुरू करणार होते, पण  फॉक्सकॉनने नुकतीच वेदांतसोबतचा करार तोडण्याची घोषणा केली. मात्र, करार मोडण्यासोबतच तैवानच्या कंपनीने असेही म्हटले होते की, भारतातील गुंतवणुकीबाबत त्यांचा हेतू बदललेला नाही. आता फॉक्सकॉन संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. तैवानचा फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप एसटी मायक्रोइलेक्ट्रॉनिक एनव्ही सोबत भारतात चीप बनवणारा कारखाना उभारण्यासाठी काम करत आहे. 

चंद्रयान-3च्या प्रक्षेपणात निभावली मोठी भूमिका; आता सौदीमधून मिळाली 33 हजार कोटींची ऑर्डर

एका अहवालानुसार, फॉक्सकॉन आणि फ्रेंच-इटालियन एसटीमायक्रो यांनी मिळून भारतात ४० नॅनोमीटर चिप प्लांट उभारण्यासाठी अर्ज करण्याची योजना आखली आहे. या दोन्ही कंपन्या मिळून चिप बनवतील जी कार, कॅमेरा, प्रिंटर आणि इतर अनेक मशीनमध्ये वापरली जाते. भारत सरकारने फॉक्सकॉनकडून STMicro सोबतच्या भागीदारीबद्दल अधिक माहिती मागितली आहे. फॉक्सकॉनची चिप बनवण्याचे तंत्रज्ञान असलेल्या इतर काही कंपन्यांशीही चर्चा सुरू असल्याची बातमी आहे. मात्र, यावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीजचे चेअरमन यंग लिऊ म्हणाले की, भविष्यात कोणतेही मोठे बदल न झाल्यास भारत जगातील एक नवीन उत्पादन केंद्र बनेल. तैवान भारताचा सर्वात विश्वासार्ह भागीदार असेल. मायनिंग किंग म्हणून ओळखले जाणारे अब्जाधीश अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या वेदांत रिसोर्सेस लिमिटेडसोबत फॉक्सकॉनची भागीदारी नुकतीच तुटल्याचे उल्लेखनीय आहे. ही भागीदारी तुटण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे फॉक्सकॉन किंवा वेदांत या दोघांनाही चिप उत्पादनाचा मोठा अनुभव नाही. 

वेदांतासोबतचा करार तुटताच फॉक्सकॉनने भारतात सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी स्वतंत्रपणे अर्ज करणार असल्याचे सांगितले होते. तैवानच्या कंपनीने सांगितले होते की भारत सरकारने त्यांच्या सेमीकंडक्टर उत्पादन धोरणांतर्गत दिलेल्या प्रोत्साहनासाठी अर्ज करण्याची योजना आखत आहे. तैवानच्या फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी भारताच्या वेदांत समूहासोबतचा १९.५ अब्ज डॉलर गुंतवणुकीचा करार रद्द केला होता.

टॅग्स :वेदांता-फॉक्सकॉन डील