Lokmat Money > बिझनेस न्यूज > टीम इंडियाच्या मॅच फी पेक्षाही जास्त विश्वचषक २०२३ मध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टंप्सची किंमत, पाहा कारण

टीम इंडियाच्या मॅच फी पेक्षाही जास्त विश्वचषक २०२३ मध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टंप्सची किंमत, पाहा कारण

२०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये वापरण्यात आलेल्या एलईडी स्टंपची नेमकी किंमत तुम्हाला कळली तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 06:08 PM2023-09-27T18:08:25+5:302023-09-27T18:09:17+5:30

२०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये वापरण्यात आलेल्या एलईडी स्टंपची नेमकी किंमत तुम्हाला कळली तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

The cost of the stumps using in the World Cup 2023 is more than the match fee of Team India see why whats special | टीम इंडियाच्या मॅच फी पेक्षाही जास्त विश्वचषक २०२३ मध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टंप्सची किंमत, पाहा कारण

टीम इंडियाच्या मॅच फी पेक्षाही जास्त विश्वचषक २०२३ मध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टंप्सची किंमत, पाहा कारण

Cricket stumps price: भारतात ५ ऑक्‍टोबर पासून विश्वचषक स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. सर्वच जण टीम इंडियाला चिअर करण्यासाठी सज्जही झालेत. काही चाहत्यांना तिकिटांच्या किमतीपासून ते खेळाडूंच्या बॅटच्या किमती आणि त्यांच्या मॅच फीपर्यंत सर्व काही जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत २०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये वापरण्यात आलेल्या एलईडी स्टंपची नेमकी किंमत तुम्हाला कळली तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

एलईडी लाईट्स आणि मायक्रोफोन असलेल्या स्टंपच्या प्रचंड किमतीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की दोन्ही सेट्स २०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये संपूर्ण टीम इंडियाला मिळालेल्या मॅच फीपेक्षा महाग आहेत. भारतीय क्रिकेट खेळाडूंना एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ६ लाख रुपये फी म्हणून दिली जाते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, संघातील १५ खेळाडूंना एका सामन्यासाठी एकूण ७८ लाख रुपये फी मिळते. त्याचबरोबर एलईडी लाईट आणि मायक्रोफोन असलेल्या स्टंपची किंमत १३ लाखांपेक्षा अधिक आहे.

एका सेटची किंमत किती?
विश्वचषक २०२३ मध्ये वापरण्यात येणाऱ्या एलईडी स्टंपच्या सेटची किंमत ५० हजार डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच ४१ लाख रुपये असू शकते. तथापि, कॅमेरा आणि जिंगल बेल्ससह एलईडी स्टंपच्या सेटची किंमत ब्रँड, डिझाइन आणि इतर अनेक बाबींवर अवलंबून असते. साधारणपणे, कॅमेरे आणि रिंग बेल्ससह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एलईडी स्टंपच्या सेटची किंमत ५० हजार डॉलर्सपर्यंत असते. आजकाल वापरल्या जाणार्‍या स्टंपमध्ये एलईडी स्टंप, कॅमेरा आणि जिंगल बेल्सचा सेट असतो. काही कंपन्या एलईडी स्टंपच्या सेटसाठी २० हजार डॉलर्स म्हणजेच १६ लाख रुपये आकारतात.

किंमत कशी जास्त?
वर्ल्ड कप २०२३ मध्ये वापरलेल्या एलईडी स्टंपच्या एका सेटची किंमत ४१ लाख रुपये असेल, तर दोन्ही सेटची किंमत ८२ लाख रुपये असेल. त्याच वेळी, प्रत्येक खेळाडूला ६ लाख रुपये या प्रमाणे टीम इंडियाच्या ११ खेळाडूंना एका सामन्याची एकूण फी म्हणून ६६ लाख रुपये आणि संघातील इतर ४ खेळाडूंना १२ लाख रुपये मॅच फी म्हणून मिळतील. एकूण मिळून टीम इंडियाची मॅच फी ७८ लाख रुपये असेल. म्हणजेच स्टंपची किंमत ही त्यापेक्षा जास्त असेल. 

कोणी तयार केले हे स्टंप्स?
एलईडी लाईट, मायक्रोफोनसह स्टंप आणि लाइट असलेल्या बेल्स ऑस्ट्रेलियाच्या ब्रोंटे अॅकरमॅन यांनी तयार केले आहेत. त्यांनी, त्यांचा व्यावसायिक भागीदार डेव्हिड लेजिटवुड सोबत, मोठ्या प्रमाणावर त्यांचं उत्पादन सुरू केलं. यातून दोघांनी मिळून झिंग इंटरनॅशनलची सुरुवात केली. या दोघांनी २०१३ मध्ये बिग बॅश लीग दरम्यान एलईडी लाइट स्टंपची कल्पना क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विकली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय आयसीसीनं २०१३ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या टी २० विश्वचषकादरम्यान प्रयोग म्हणून या स्टंप आणि बेल्सचा वापर केला.

Web Title: The cost of the stumps using in the World Cup 2023 is more than the match fee of Team India see why whats special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.