Join us

देश संकटात अन् लाखो कर्जबुडवे काळ्या यादीत; लॉकडाऊनमुळे आर्थिक गणित बिघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 09:11 IST

१८ ते ५९ या वयोगटातील लक्षावधी चिनी नागरिक कर्ज फेडण्यात अयशस्वी झाले असून, त्यांना काळ्या यादीत टाकले आहे.

बीजिंग/नवी दिल्ली : १८ ते ५९ या वयोगटातील लक्षावधी चिनी नागरिक कर्ज फेडण्यात अयशस्वी झाले असून, त्यांना काळ्या यादीत टाकले आहे. ‘व्हॉईस ऑफ अमेरिका’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, कोविड साथीच्या लॉकडाऊन काळात आर्थिक घडी विस्कटल्यामुळे या नागरिकांनी कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड करणे नागरिकांना जमलेच नाही. आता त्यांना काळ्या यादीत जावे लागले आहे.

 वृत्तात म्हटले आहे की, झँग काँगझी नावाच्या एका व्यक्तीने २ ते ३ वर्षांपूर्वी ऑनलाइन कर्ज घेतले होते. आता त्याच्याकडे कर्जाची परतफेड करायला पैसेच नाहीत. (वृत्तसंस्था) 

टोल रोड वापरास बंदी

वृत्तात म्हटले आहे की, चीनची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी झगडत आहे. बेरोजगारी उच्च पातळीवर आहे. कर्जबाजारी लोकसंख्येत वाढ होत आहे. काळ्या यादीत टाकलेल्या लोकांना नवी कर्जे मिळण्यात अडचणी येत आहेत. काही नागरिकांना तर नागरी सेवेत काम करण्यापासून रोखण्यात आले आहे. अनेकांना टोल रोड वापरण्यास, ऑनलाइन खरेदी तसेच मोबाइल पेमेंट करण्यास बंदी घातली आहे.