Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील सर्वात मोठा डेटा लीक; आधार, पासपोर्टसह सर्व माहिती Dark web वर विक्रीसाठी केली उपलब्ध

देशातील सर्वात मोठा डेटा लीक; आधार, पासपोर्टसह सर्व माहिती Dark web वर विक्रीसाठी केली उपलब्ध

देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक समोर आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 10:20 AM2023-10-31T10:20:46+5:302023-10-31T10:23:09+5:30

देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक समोर आला आहे.

The country s biggest data leak All information including Aadhaar passport available for sale on dark web know details | देशातील सर्वात मोठा डेटा लीक; आधार, पासपोर्टसह सर्व माहिती Dark web वर विक्रीसाठी केली उपलब्ध

देशातील सर्वात मोठा डेटा लीक; आधार, पासपोर्टसह सर्व माहिती Dark web वर विक्रीसाठी केली उपलब्ध

देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक समोर आला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे (ICMR) उपलब्ध ८१.५ कोटी भारतीयांची माहिती विकली जात आहे. हे प्रकरण इतके गंभीर आहे की आयसीएमआरच्या तक्रारीवरून देशातील सर्वात मोठी तपास संस्था सीबीआय त्याची चौकशी करू शकते.

सोशल मीडिया प्लॅॉफॉर्म एक्सवर एका 'थ्रेट अॅक्टरनं' डार्क वेबवर ब्रीच्ड फोरममध्ये डेटाबेसची जाहिरात टाकली आहे. यामध्ये ८१.५ कोटी भारतीयांच्या आधार, पासपोर्ट, नाव, फोन नंबर आणि पत्ता असल्याचा दावा करण्यात आलाय. हा डेटा कुठून लीक झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, कारण कोविड तपासणीचा डेटा आयसीएमआरसोबतच नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आणि आरोग्य मंत्रालयाकडेही जातो.

न्यूज १८ नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, हॅकिंग आणि फिशिंगसारख्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी नोडल एजन्सी सीईआरटी-इनने आयसीएमआरला याबद्दल माहिती दिली आहे. माहितीनुसार, समोर आलेला सँपल डेटा आयसीएमआरकडे उपलब्ध असलेल्या वास्तविक डेटाशी तंतोतंत जुळतो. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन अनेक यंत्रणा आणि मंत्रालयांचे सर्व उच्च अधिकारी त्याबाबत सक्रिय झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर या लीकमागे परदेशी हात असल्याचं मानलं जात असेल तर त्याची मोठ्या एजन्सीकडून चौकशी करावी लागणार आहे.

कसा झाला खुलासा?
अमेरिकन सायबर सिक्युरिटी आणि इंटेलिजेंस एजन्सी रीसिक्युरिटीने सर्वप्रथम याची दखल घेतली. एजन्सीला आढळलं की थ्रेट अॅक्टर 'pwn0001' यानं ९ ऑक्टोबर रोजी ब्रीच फोरमवर ८१.५ कोटी भारतीयांचा डाटाबेस विकला जात असल्याचा दावा करणारी एक थ्रेड पोस्ट केली होती.

देशाची लोकसंख्या १४८.६ कोटी आहे, म्हणजेच जवळपास ५५ टक्के भारतीयांचा डाटाबेस ऑनलाइन उपलब्ध आहे. यावरून हा डेटा किती भयावह आहे, याचा अंदाज येतो. pwn0001 ने पुरावा म्हणून आधार डेटा असलेले चार मोठे लीक सँपल्स पोस्ट केले आहेत. एका सँपलमध्ये १ लाख नोंदी आहेत.

Web Title: The country s biggest data leak All information including Aadhaar passport available for sale on dark web know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.