Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशाला आणखी एक विमानसेवा मिळणार, स्वस्तात करता येणार प्रवास; सरकारकडून मिळाली मंजूरी

देशाला आणखी एक विमानसेवा मिळणार, स्वस्तात करता येणार प्रवास; सरकारकडून मिळाली मंजूरी

देशात नव्या एका विमान कंपनीला नागरी उड्डान मंत्रालयाने एनओसी दिली आहे. या कंपनीने देशातील लहान शहरांना जोडण्यासाठी नवीन योजना बनवल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 12:54 PM2024-07-09T12:54:19+5:302024-07-09T12:55:04+5:30

देशात नव्या एका विमान कंपनीला नागरी उड्डान मंत्रालयाने एनओसी दिली आहे. या कंपनीने देशातील लहान शहरांना जोडण्यासाठी नवीन योजना बनवल्या आहेत.

The country will get another airline, affordable travel; Approval received from Govt | देशाला आणखी एक विमानसेवा मिळणार, स्वस्तात करता येणार प्रवास; सरकारकडून मिळाली मंजूरी

देशाला आणखी एक विमानसेवा मिळणार, स्वस्तात करता येणार प्रवास; सरकारकडून मिळाली मंजूरी

देशाला आणकी एख नवीन विमानसेवा मिळणार आहे. एअरलाइन एअर केरळला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. सरकारकडून एनओसी मिळाल्यानंतर, एअर केरळने २०२५ मध्ये आपली सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. सुरुवातीला एअर केरळ तीन ATR 72-600 विमाने वापरणार आहे. ते देशातील टियर 2 आणि टियर 3 सारखी लहान शहरे जोडेल. एअर केरळने दुबईत पत्रकार परिषदेत एनओसी मिळाल्याची घोषणा केली आहे.

LPG ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी, केंद्रीय मंत्र्यांनी केली 'ही' मोठी घोषणा

एअर केरळ ही भारतातील दक्षिणेकडील राज्याची पहिली प्रादेशिक विमान कंपनी असेल Zettfly Aviation नावाने नोंदणीकृत विमान कंपनीला ३ वर्षांसाठी हवाई वाहतूक सेवा चालवण्याची परवानगी मिळाली आहे. एअर केरळला दुबईचे उद्योगपती अफी अहमद आणि अयुब कल्लाडा यांचे समर्थन आहे. यावेळी आफी अहमद म्हणाले की, आमच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे हे फळ आहे. आमच्या योजनेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. पण, हे स्वप्न आम्ही सत्यात उतरवले आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

गेल्या वर्षी, स्मार्ट ट्रॅव्हल्स एजन्सीचे संस्थापक आफी अहमद यांनी airkerala.com डोमेन नाव १० लाख दिरहाममध्ये खरेदी केले होते. केरळ सरकारने २००५ मध्ये पहिल्यांदाच एअर केरळबाबत नियोजन केले होते. अहवालानुसार पुढील वर्षी विमानसेवा सुरू होईल. एअर केरळने लहान शहरांना परवडणारी विमानसेवा देण्याची योजना आखली आहे. आता विमान खरेदी करून एअर ऑपरेटर सर्टिफिकेट मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आयुब कल्लाडा यांनी सांगितले. विमाने खरेदी करण्याबरोबरच ती भाडेतत्त्वावर घेण्याचाही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय उड्डानांसाठी प्रयत्न करणार

आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यापूर्वी एअर केरळला प्रादेशिक उड्डाणे चालवावी लागतील. एअर केरळ एअरलाइन्सच्या ताफ्यात २० विमाने झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करणार आहेत. आफी अहमद म्हणाले की, आमचे पहिले आंतरराष्ट्रीय विमान दुबईला जाणार आहे. यानंतर आम्ही इतर मार्गांवरही सेवा सुरू करू. एअर केरळमध्ये सुरुवातीला सुमारे ११ कोटी दिरहमची गुंतवणूक केली जाणार आहे.

Web Title: The country will get another airline, affordable travel; Approval received from Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.