Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकेवरील मंदीचं संकट आणखी गडद, भारतात सर्वात आधी सेक्टर्सवर पडणार प्रभाव

अमेरिकेवरील मंदीचं संकट आणखी गडद, भारतात सर्वात आधी सेक्टर्सवर पडणार प्रभाव

Recession In USA 2024: अमेरिकेत आलेली आर्थिक सुस्ती जगभरातील टेक सेक्टरची चिंता वाढवत आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसान यावर्षी जगभरात १ लाख ३० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कर्मचारी कपातीमुळे गेल्या आहेत. सिस्को, इंटेल, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 08:57 PM2024-08-15T20:57:06+5:302024-08-15T20:57:55+5:30

Recession In USA 2024: अमेरिकेत आलेली आर्थिक सुस्ती जगभरातील टेक सेक्टरची चिंता वाढवत आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसान यावर्षी जगभरात १ लाख ३० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कर्मचारी कपातीमुळे गेल्या आहेत. सिस्को, इंटेल, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.

The crisis of recession on America is getting worse, sectors will be affected first in India   | अमेरिकेवरील मंदीचं संकट आणखी गडद, भारतात सर्वात आधी सेक्टर्सवर पडणार प्रभाव

अमेरिकेवरील मंदीचं संकट आणखी गडद, भारतात सर्वात आधी सेक्टर्सवर पडणार प्रभाव

अमेरिकेत आलेली आर्थिक सुस्ती जगभरातील टेक सेक्टरची चिंता वाढवत आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसान यावर्षी जगभरात १ लाख ३० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कर्मचारी कपातीमुळे गेल्या आहेत. सिस्को, इंटेल, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. चिंतेची बाब म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्येही ही कामगार कपात थांबण्याची चिन्हे नाही आहेत.  

त्याचं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये मंदीचं सावट अधिकाधिक गडद होऊ लागलं आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर संकटाचे ढग गोळा होऊ लागले आहेत. त्यातही भारतामध्ये आयटी क्षेत्रासह इतर क्षेत्रांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अमेरिकेमधील अनेक प्रमुख इकॉनॉमिक इंडिकेटर्समध्ये कमकुवतपणाचे संकेत दिसत आहेत. बेरोजगारीचे प्रमाणही जानेवारीतील निचांकावरून कमालीचं वाढलं आहे. जुलै महिन्यात बेरोजगारीचा दर ३ वर्षांमधील सर्वोच्च अशा ४.३ पर्यंत पोहोचला आहे. याशिवाय उत्पादन क्षेत्रातील पीएमआय मागच्या नऊ महिन्यांतील निचांकावर पोहोचला आहे.  

यादरम्यान, अमेरिकन अर्थव्यवस्थेने मंदीमधून सावरण्याचे संकेतही दिले आहेत. त्यात जुलै ते सप्टेंबर तिमाहीत जीडीपीमधील वाढ अंदाजित २.६ टक्क्यांवरून २.९ टक्के केली जाणं, वेतनामधील वाढ ही महागाईच्या दरापेक्षा अधिक असणं, घरांच्या किमती वाढणं,  यांचा समावेश आहे. एकूणच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेकडून संमिश्र संकेत मिळत आहेत. त्यामुळे आर्थिक सुस्ती ही मंदीमध्ये परिवर्तित होईल का, हे सांगणं कठीण आहे.  

मात्र परिस्थिती सुधारली नाही तर अमेरिकेची अर्थव्यवस्था ही मंदीच्या गर्तेत जाऊ शकते. तसेच त्याचा भारतावरही प्रभाव पडणार आहे. त्यामध्ये अमेरिकेतील मागणी घटल्याने भारतामधून होणाऱ्या निर्यातीचीही मागणी घटणार आहे. आयटी, फार्मा आणि वस्त्रोद्योग क्षेत्र अमेरिकन बाजारावर अवलंबून आहे. त्याशिवाय आर्थिक मंदीमध्ये जागतिक पुरवढ्याच्या क्रमात अडथळा आल्यास भारतीय निर्यातदारांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होणार आहे.  

Web Title: The crisis of recession on America is getting worse, sectors will be affected first in India  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.