Lokmat Money > बिझनेस न्यूज > Money: सध्याच्या तरुणाईचा कर्जाकडे वाढता कल, व्याजदर वाढूनही उधारीवर खरेदी जाेमात

Money: सध्याच्या तरुणाईचा कर्जाकडे वाढता कल, व्याजदर वाढूनही उधारीवर खरेदी जाेमात

Money: मागील आर्थिक वर्षात वैयक्तिक कर्जाचा व्याजदर सुमारे दीडपट वाढला असतानाही या कर्जात फेब्रुवारीमध्ये २०.४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. भारतात कर्जाची मागणी वाढण्यात तरुणांची भूमिका मोठी राहिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 11:57 AM2023-04-19T11:57:12+5:302023-04-19T11:57:38+5:30

Money: मागील आर्थिक वर्षात वैयक्तिक कर्जाचा व्याजदर सुमारे दीडपट वाढला असतानाही या कर्जात फेब्रुवारीमध्ये २०.४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. भारतात कर्जाची मागणी वाढण्यात तरुणांची भूमिका मोठी राहिली आहे.

The current youth has an increasing tendency towards loans, even with the increase in interest rates, purchases can be made on credit | Money: सध्याच्या तरुणाईचा कर्जाकडे वाढता कल, व्याजदर वाढूनही उधारीवर खरेदी जाेमात

Money: सध्याच्या तरुणाईचा कर्जाकडे वाढता कल, व्याजदर वाढूनही उधारीवर खरेदी जाेमात

नवी दिल्ली - मागील आर्थिक वर्षात वैयक्तिक कर्जाचा व्याजदर सुमारे दीडपट वाढला असतानाही या कर्जात फेब्रुवारीमध्ये २०.४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. भारतात कर्जाची मागणी वाढण्यात तरुणांची भूमिका मोठी राहिली आहे.

भारतीय तरुणांचा क्रेडिट कार्डावरील खर्च, तसेच कंझ्युमर ड्यूरेबल कर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. उदा. एक वर्षात १८ ते ३० या वयोगटातील तरुणांकडून कर्जाची चौकशी करण्याचे प्रमाण ५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर गेले आहे.  ‘ट्रांसयुनियन सिबिल’च्या आकडेवारीतून ही माहिती उघड झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२२ मध्ये वैयक्तिक कर्जातील वाढ १४.७ टक्के होती. 
यंदाच्या जानेवारीत तसेच गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्येही वैयक्तिक कर्जाचा वृद्धी दर २० टक्क्यांपेक्षा अधिक होता.  रेपो दरात वाढ झाल्याचा वैयक्तिक कर्जावर जास्त  परिणाम झाल्याचे दिसून येत  नाही. अन्य कर्जावर परिणाम  झाला आहे.
 

Web Title: The current youth has an increasing tendency towards loans, even with the increase in interest rates, purchases can be made on credit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.