इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. ऑडिटची आवश्यकता नसलेल्या वैयक्तिक आणि पगारदार कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक वर्ष २०२१-२२ किंवा असेसमेंट वर्ष २०२२-२३ साठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ आहे. तुम्हाला कर लागतो, तो कर कसा मोजावा, हे जाणून घेऊ.
उत्पन्नाचे स्रोत काय?
प्राप्तिकर रिटर्न भरण्यापूर्वी एकूण करपात्र उत्पन्न मोजणे आवश्यक आहे. त्यामुळे नेमका किती कर भरावा लागेल याचा अंदाज लावता येईल.
एकूण करपात्र उत्पन्नाचे मोजमाप व्यक्तीच्या उत्पन्नाच्या सर्व स्रोतांच्या आधारे केले जाते. कर कायद्यानुसार याला, पगार, घराची मालमत्ता, शेअर्समधील गुंतवणूक आणि म्युच्युअल फंड यासह पाच भागांमध्ये विभागले गेले आहे.
पगार, घरभाडे आणखी काय?
- पगारातून उत्पन्न (फॉर्म १६)
- घराच्या मालमत्तेतून उत्पन्न (भाडे)
- भांडवली नफ्यातून उत्पन्न (शेअर बाजार, घर)
- व्यवसायातून उत्पन्न (वकील किंवा सीए सारखे वैयक्तिक)
- इतर स्रोतांतून उत्पन्न (बँक खाते, फिक्स्ड डिपॉझिट, बचत योजना)
कर मोजणी : सर्व स्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाची मोजदाद केल्यानंतर तुम्हाला एकूण करपात्र उत्पन्न काढता येईल. जे अजूनही जुन्या कर प्रणालीला वापरत आहेत, ते ८०सी, ८०डी, ८०सीसीडी सारख्या कपातीचा दावा करू शकतात. कपात केल्यानंतर, निव्वळ करपात्र उत्पन्न उपलब्ध होईल, ज्यावर कर गणना केली जाईल.
वार्षिक उत्पन्न नवीन कर
२.५ लाखांपर्यंत कर नाही
२.५ ते ५ लाख ५%
५ ते ७.५ लाख १०%
७.५ ते १० लाख १५%
१० ते १२.५ लाख २०%
१२.५ ते १५ लाख २५%
१५ लाखांपेक्षा अधिक ३०%