भारतात ई कॉमर्स क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे बन्सल बंधू आता फ्लिपकार्टमधून बाहेर पडले आहेत. २०१८ मध्ये वॉलमार्टने फ्लिपकार्टला विकत घेतल्यानंतर सचिन बन्सल यांनी आधीच राजीनामा दिला होता. आता बिन्नी बन्सल यांनीही राजीनामा दिला आहे.
बिन्नी बन्सल यांनी काही दिवसांपूर्वीच OppDoo हे नवीन व्हेन्चर लाँच केले होते. त्यात आता ते लक्ष घालणार आहेत. बिन्नी बन्सल यांच्या राजीनाम्याला फ्लिपकार्ट आणि बिन्नी बन्सल यांनीही दुजोरा दिला आहे. या राजीनाम्यामुळे फ्लिपकार्टवरून सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांची नावे पूर्णपणे हटविण्यात आली आहेत.
OppDoor च्या वेबसाइटनुसार कंपनी विविध प्रकारच्या सेवा पुरवते. वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, OppDoor च्या सेवा ब्रँडच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंतच्या आवश्यक सर्व सेवा पुरवतात. कंपनी पूर्णपणे मॅनेज केलेल्या ऑपरेशन्स आणि बिझनेस अॅडव्हायझरी अशा दोन्ही सेवा प्रदान करत असल्याचं वेबसाईटवर नमूद करण्यात आलंय.
या दोघांनी आपले स्टेक वॉलमार्टला विकले होते. वास्तविक, २०२३ मध्ये संपलेल्या वॉलमार्टसोबतच्या डीलमध्ये ५ वर्षांचा नॉन कम्पिट क्लॉजदेखील होता. यानंतर बिन्नी बसल पुन्हा ई-कॉमर्स क्षेत्रात स्टार्टअप सुरू करू शकणार होते. फ्लिपकार्टचे सह-संस्थापक असलेले सचिन बन्सल नवी ही फिनटेक कंपनी चालवत आहेत.