India Top Brand Valuable Companies: रतन टाटा यांच्या नेतृत्वातील टाटा ग्रुपने पुन्हा एकदा देशातील सर्वात मौल्यवान कंपनीच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. ब्रँड फायनान्सने जारी केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार, टाटा ग्रुप पुन्हा एकदा भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड बनला आहे. टाटा ग्रुपची ब्रँड व्हॅल्यू 28.6 अब्ज डॉलर एवढी आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ डिजिटलायझेशन, ई-कॉमर्स, इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्सवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नवीन व्यवसायमुळे झाली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर इन्फोसिस आहेअहवालात म्हटले की, टाटा ग्रुपची ब्रँड व्हॅल्यू पहिल्यांदाच $30 बिलियनच्या जवळ येत आहे आणि हे भारतीय अर्थव्यवस्थेवरील वाढत्या आत्मविश्वासाचे प्रतिबिंबित करते. दरम्यान, मौल्यवान ब्रँडच्या या यादीत इन्फोसिस 14.2 अब्ज डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्यूसह दुसऱ्या स्थानावर आहे. HDFC ग्रुप, HDFC लिमिटेडमध्ये विलीन झाल्यामुळे तो $10.4 अब्ज ब्रँड व्हॅल्यूसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
हे भारतातील सर्वोच्च मौल्यवान ब्रँड अहवालानुसार, एलआयसी ग्रुप, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय ग्रुप, एअरटेल, एचसीएल टेक, लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा आणि झेटवर्क्स हे देखील मौल्यवान भारतीय ब्रँड्समध्ये आहेत.
ही कंपनी इंजीनिअरिंग ब्रँडमध्ये अग्रेसर Zetwerk ने $543 मिलियन ब्रँड व्हॅल्यूसह सर्वात मौल्यवान इंजीनिअरिंग ब्रँडमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. केवळ सहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या कंपनीने आपल्या नवीनतम तंत्रज्ञान-सक्षम उत्पादन सेवांद्वारे स्वतःला एक लीडर म्हणून पुढे आणले. ऊर्जा, संरक्षण, ऑटोमोटिव्ह आणि कोअर इंजीनिअरिंग यांसारख्या विविध क्षेत्रांना सेवा देणाऱ्या Zetwork च्या वाढीमुळे कंपनीने 64 व्या सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँड म्हणून स्थान मिळवले आहे.