Join us

बहिष्कारामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला फटका बसणार! फक्त पर्यटनावरच परिणाम होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 4:38 PM

गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीव ट्रेंड जोरदार सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी लक्षद्वीप दौऱ्यावर गेले होते. यानंतर सोशल मीडियावर पीएम मोदींचे फोटो आणि व्हिडीओ जोरदार व्हायरल झाले. दुसरीकडे मालदीवच्या काही मंत्र्यांनी पीएम मोदींबद्दल काही आक्षेपार्ह कमेंट केली, यावरुन जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर रविवारीच मालदीव सरकारने त्या मंत्र्यांना निलंबित केले. मात्र आता मालदीवच्या मंत्र्यांच्या कृतीचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागत असून, त्याचा थेट परिणाम तेथील अर्थव्यवस्थेवर होणार आहे.

सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण; शेअर बाजार ६७० अंकांनी घसरला, अदानींच्या दोन शेअर्समध्ये तेजी

मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या कमेंटनंतर, भारताच्या एका मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीने मालदीवच्या सर्व फ्लाइटचे बुकिंग स्थगित केले आहे. दरम्यान, बॉयकॉट मालदीव सोशल मीडियावर देखील वेगाने ट्रेंड करत आहे. अशा परिस्थितीत जर भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणे बंद केले तर ते त्यांच्या अर्थव्यवस्थेला महागात पडणार हे निश्चित, कारण तेथे पोहोचणारे बहुतांश परदेशी पर्यटक हे भारतातूनच आहेत. पर्यटनाव्यतिरिक्त मालदीव अनेक प्रकारे भारतावर अवलंबून आहे.

मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये एकूण १७.५८ लाख परदेशी पर्यटक मालदीवमध्ये पोहोचले होते. त्यापैकी बहुतांश भारतीय पर्यटक होते. यानंतर रशियन पर्यटक येतात. गेल्या वर्षी १३ डिसेंबरपर्यंत एकूण २,०९,१९८ भारतीय पर्यटक मालदीवमध्ये पोहोचले होते. तर या तारखेपर्यंत २,०९,१४६ रशियन पर्यटक तेथे पोहोचले होते. तिसर्‍या क्रमांकावर चीन होता ज्याच्या १,८७,११८ पर्यटकांनी मालदीवला भेट दिली. 

मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. जो परकीय चलन कमावण्याचा आणि सरकारी महसूलाचा प्रमुख स्रोत आहे. मालदीवच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा थेट वाटा एक चतुर्थांश आहे आणि अप्रत्यक्षपणे जीडीपीचा खूप मोठा वाटा आहे. रोजगार तर मालदीवमधील लोकांसाठी पर्यटन हा सर्वात मोठा स्त्रोत आहे. रोजगारामध्ये पर्यटनाचा वाटा एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे. संबंधित क्षेत्रांचा समावेश केल्यास एकूण रोजगारामध्ये पर्यटनाचा वाटा सुमारे ७० टक्के आहे.

'या' क्षेत्रावरही होणार परिणाम

मालदीव भारत २०२१ मध्ये मालदीवचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला. भारत प्रामुख्याने मालदीवमधून भंगार धातू आयात करतो. तर भारत विविध प्रकारची अभियांत्रिकी आणि औद्योगिक उत्पादने जसे की फार्मास्युटिकल्स, रडार उपकरणे, रॉक बोल्डर्स, सिमेंट मालदीवला निर्यात करतो. त्यात तांदूळ, मसाले, फळे, भाजीपाला आणि पोल्ट्री उत्पादनांसारख्या कृषी उत्पादनांचाही समावेश आहे. यामुळे आता या क्षेत्रावरही जोरदार परिणाम होणार आहे. 

टॅग्स :मालदीवअर्थव्यवस्था