BSNL 4G Launch Date : बीएसएनएलच्या 4G सेवेची ग्राहक दीर्घ कालावधीपासून वाट पाहत आहेत. अन्य कंपन्यांनी सध्या 5G सेवा सुरू केली आहे. परंतु बीएसएनएलनं अद्याप 4G सेवा सुरू केलेली नाही. परंतु आता ग्राहकांना अधिक काल प्रतीक्षा करावी लागणार नाही. कंपनी लवकरच 4G आणि 5G सेवा लाँच करू शकते.
रिपोर्ट्सनुसार बीएसएनएल 4G ची सुरूवात पुढील वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये होऊ शकते. कंपनीनं टीसीएससोबत प्रुफ ऑफ कॉन्सेप्ट पूर्ण केलं आहे. यानंतर जागतिक बाजारपेठेचाही दरवाजा खुला होईल अशी टीसीएसला अपेक्षा आहे.
टीसीएस-बीएसएनएल सोबत
जागतिक बाजारपेठएत नोकिया, एरिक्सन आणि ह्युवावे या कंपन्यांचं वर्चस्व आहे. रिपोर्ट्सनुसार 4G PoC (प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट) चं ट्रायल कंपनीनं गेल्या महिन्यात चंडीगढमध्ये केलं होतं.याचाच अर्थ देशात लवकरच बीएसएनएलची 4G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही कंपनीनं एका ग्राहकाला रिप्लाय देत 4G सेवा कधी सुरु होणार याची माहिती दिली होती. पुढील वर्षी ही सेवा सुरू होणार असल्याचं कंपनीनं म्हटलं होतं. बीएसएनएल आणि टीसीएसला अद्याप प्रायसिंग आणि कमर्शिअल टर्म्स निश्चित करणं बाकी आहे. कंपनीला 1 लाख साईट्सवर स्वदेशी 4G टॉवर्स लावू इच्छिते. परंतु देशात ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता आहे.