Lokmat Money > बिझनेस न्यूज > सामान्यांच्या गुंतवणुकीवर कार कंपन्यांचा डोळा !

सामान्यांच्या गुंतवणुकीवर कार कंपन्यांचा डोळा !

विक्री वाढविण्यासाठी नवी शक्कल, मर्सिडीजच्या अधिकाऱ्याला नेटकऱ्यांनी सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 11:29 AM2022-11-29T11:29:23+5:302022-11-29T11:30:09+5:30

विक्री वाढविण्यासाठी नवी शक्कल, मर्सिडीजच्या अधिकाऱ्याला नेटकऱ्यांनी सुनावले खडे बोल

The eyes of car companies on the investment of ordinary people! where is good investment | सामान्यांच्या गुंतवणुकीवर कार कंपन्यांचा डोळा !

सामान्यांच्या गुंतवणुकीवर कार कंपन्यांचा डोळा !

नवी दिल्ली: उधळपट्टी न करता पैसे वाचवून ते थोडे थोडे गुंतवण्याची भारतीयांची सवय जुनीच आहे. 'एसआयपी' हा त्यातला एक नवा प्रकार. मात्र, या सवयीमुळे लग्झरी कार विक्रीला फटका बसत आहे. भारतीयांच्या एसआयपीमधील गुंतवणुकीचे चक्र मोडल्यास देशात लग्झरी गाड्यांच्या विक्रीला फार मोठी संधी आहे, असे मत मर्सिडिज बेंझ इंडियाचे मार्केटिंग हेड संतोष अय्यर यांनी व्यक्त केले. 

कोरोना महामारीनंतर भारतात बचत करण्याच्या सवयीत बदल दिसला आहे. मी माझ्या टीमला सांगतो, की तुम्ही हे गुंतवणुकीचे चक्र मोडले तर या क्षेत्रात मोठी वाढ नक्की होणार. विक्रमी एसआयपी गुंतवणूक एसआयपीमधील गुंतवणुकीने यावर्षी मे महिन्यात १२ हजार कोटी रुपयांचा आकडा गाठला होता. हा आकडा ऑक्टोबरमध्ये १३ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला. स्पर्धा एसआयपीसोबत आहे, असे अय्यर म्हणतात. लग्झरी कारविक्रीत वाढ लग्झरी कारविक्रीत यावर्षी सुमारे ५५ टक्के वाढ झाली आहे. जानेवारी ते जून २०२२ या कालावधीत १७ हजार लग्झरी कार्सची विक्री झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ११ हजार एवढा होता, असे अय्यर यांनी सांगितले

म्हणून करतात गुंतवणूक ...

पश्चिमेकडील देशांच्या तुलनेत स्वतःसाठी आणि मुलांसाठी बचत करण्याची सवय भारतीय खूप गांभीर्याने घेतात. त्यासाठी सामाजिक सुरक्षेचा अभाव असल्याचे प्रमुख कारण आहे, असे अय्यर म्हणाले.
उलट एसआयपी वाढवा, नेटकऱ्यांचा सल्ला

संतोष अय्यर यांनी कमी विक्रीसाठी एसआयपीला दोषी ठरविल्यावरून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांना गुंतवणुकीची सवय मोडून आपल्या मुलांचे भविष्य बुडवून कार घ्यावी असे वाटते. उलट एसआयपी वाढवा, असा सल्ला द्विटरवर लोकांनी दिला आहे. एकाने म्हटले आहे, की सरासरी एसआयपी ही ३ ते ५ हजार रुपयांची आहे.

■ मर्सिडिजची सर्वात कमी किमतीची कार ५० लाख रुपयांची आहे. त्यासाठी किमान ८० हजार रुपयांचा इएमआय आहे.
■ मर्सिडिज भारतात ५ लाख रुपयांची लग्झरी कार आणणार आहे का किंवा त्यांना भारत समजलाच नाही, अशी प्रतिक्रिया एकाने दिली.

Web Title: The eyes of car companies on the investment of ordinary people! where is good investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.