Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोबाइल फोनचे जनकच म्हणतात...लोकांनी मोबाइलशिवाय आयुष्य जगावं!

मोबाइल फोनचे जनकच म्हणतात...लोकांनी मोबाइलशिवाय आयुष्य जगावं!

अमेरिकी इंजिनिअरने दिला वास्तविक जीवन जगण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 05:53 AM2022-07-05T05:53:09+5:302022-07-05T05:53:33+5:30

अमेरिकी इंजिनिअरने दिला वास्तविक जीवन जगण्याचा सल्ला

The father of mobile phones Martin Kapoor says People should live life without mobiles! | मोबाइल फोनचे जनकच म्हणतात...लोकांनी मोबाइलशिवाय आयुष्य जगावं!

मोबाइल फोनचे जनकच म्हणतात...लोकांनी मोबाइलशिवाय आयुष्य जगावं!

नवी दिल्ली - मोबाईल फोनचे जनक मार्टिन कूपर यांना आपल्या संशोधनाबद्दल दु:ख होत आहे. लोक आवश्यकतेपेक्षा जास्त मोबाईल फोन वापरत असल्याबद्दल त्यांची तक्रार आहे. जगभरातील मोबाईल फोन वापरकर्त्यांना त्यांनी एकच सल्ला दिला आहे की, मोबाईल फोनवर आभासी जगात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपले खरे जीवन जगा. अमेरिकेतील ९३ वर्षीय अभियंत्याने म्हटले की, लोकांनी आपले प्राधान्यक्रम निश्चित करण्याची वेळ आली आहे.

चार्ज करण्यासाठी लागायचे १० तास
मार्टिन यांनी ३ एप्रिल १९७३ रोजी जगातील पहिला मोबाइल कॉल केला होता आणि हा मोबाइल बनवण्यासाठी मार्टिन आणि त्यांच्या टीमला ३ महिने लागले होते. त्याची बॅटरी २५ मिनिटे चालायची आणि चार्ज करण्यासाठी दहा तास लागायचे. तो १० इंच लांब व अडीच पौंड वजनी होता. याशिवाय प्रत्येकाला वेगवेगळे क्रमांक देण्याची कल्पनाही मार्टिन यांचीच होती.

भारतीय रोज ४.७ तास मोबाइलवर
एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षण : जागतिक पातळीवर लोक रोज सरासरी ४.८ तास फोनवर घालवतात. मोबाईल फोन वापरण्याच्या बाबतीत भारत जगात चीननंतर दुसऱ्या स्थानी. गेल्यावर्षी भारतीयांनी ६९.९ कोटी तास मोबाईलवर घालवले. रोज सरासरी ४.७ तास वेळ मोबाईलवर. २४ तासांपैकी फक्त ५% वेळ मोबाइलवर घालवत असल्याचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना स्वतः सांगितले. १९७०दशकात मार्टिन हे पहिला मोबाइल फोन बनवणाऱ्या मोटोरोला टीमचे पर्यवेक्षक होते. १९७३मध्ये सार्वजनिक ठिकाणी पोर्टेबल मोबाइल फोन वापरणारे ते पहिले व्यक्ती बनले.

जगात किशोरवयीन मुलांना मोबाइलचे व्यसन

७२% लोक सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मोबाईलवर मेसेज व नोटिफिकेशन पाहतात.

५६% लोकांना फोन जवळ नसल्यावर एकटे व उदास वाटते.

५४% लोकांनी मान्य केले की, ते मोबाईलवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवतात.

८७.८% वापरकर्त्या लोकांना फोन जवळ नसल्यावर घबराट वाटते.

७३.४% आपला फोन टॉयलेटमध्येही घेऊन जातात.

६९% लोक झोपण्याआधी ५ मिनिटे फोन चेक करतात.

४३.५% लोक दिवसातून कमीत कमी ५० ते १०० वेळा फोन अनलॉक करतात.

 

Web Title: The father of mobile phones Martin Kapoor says People should live life without mobiles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल