Lokmat Money > बिझनेस न्यूज > यंदा तुमच्या पगारात हाेणार इतकी वाढ; काहींसाठी खुशी तर काहींना मिळेल ठेंगा

यंदा तुमच्या पगारात हाेणार इतकी वाढ; काहींसाठी खुशी तर काहींना मिळेल ठेंगा

आयुर्विज्ञान क्षेत्रात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत उच्च वेतनवाढ मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 09:28 AM2023-03-31T09:28:58+5:302023-03-31T09:29:28+5:30

आयुर्विज्ञान क्षेत्रात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत उच्च वेतनवाढ मिळेल.

The financial year has come to an end and the salaried class is looking for a salary hike. | यंदा तुमच्या पगारात हाेणार इतकी वाढ; काहींसाठी खुशी तर काहींना मिळेल ठेंगा

यंदा तुमच्या पगारात हाेणार इतकी वाढ; काहींसाठी खुशी तर काहींना मिळेल ठेंगा

मुंबई : आर्थिक वर्ष संपायला आले असून नाेकरदार वर्गाला पगारवाढीचे वेध लागलेले आहेत. यावेळी पगार किती वाढणार?, हा प्रश्न प्रत्येक नोकरदाराला पडला आहे. तर, महागाई, उच्च व्याजदर आणि अर्थव्यवस्थेतील नरमाई यामुळे यंदा सर्वच क्षेत्रात सरासरी ९.१ टक्के वेतनवाढ होईल, असा अंदाज एका संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

सल्ला संस्था ‘डेलॉयट इंडिया’ने बुधवारी जारी केलेल्या ‘प्रतिभा परिदृश्य २०२३’ या अहवालात म्हटले आहे की, जानेवारी २०२३ मध्ये ७ क्षेत्रे आणि २५ उप-क्षेत्रांतील ३०० संस्थांत केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वच क्षेत्रात किंचित कमी वेतनवाढ मिळेल. आयुर्विज्ञान क्षेत्रात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत उच्च वेतनवाढ मिळेल. मात्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मंदीचे सावट असल्यामुळे वेतनवाढीत मोठी घसरण होईल, असा अंदाज आहे. 

महागाई, उच्च व्याज दर आणि मंदावलेली अर्थव्यवस्था यामुळे रोजगारदाता संस्था यंदा अधिक सतर्क राहण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये वेतनवाढीसह नोकरी सोडण्याचा दर कमी राहील
- आनंदरूप घोष, ‘डेलॉयट टच तोहमात्सु इंडिया एलएलपी’चे (डेलॉयट इंडिया) भागीदार

Web Title: The financial year has come to an end and the salaried class is looking for a salary hike.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.