Lokmat Money > बिझनेस न्यूज > Meta: मेटाच्या साम्राज्याला प्रथमच मोठा धक्का

Meta: मेटाच्या साम्राज्याला प्रथमच मोठा धक्का

Meta: फेसबुकची कंपनी मेटाच्या समभागांमध्ये २६ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाल्याने जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीने बुधवारी मेटाचे रेटिंग कमी केले आहे. हे रेटिंग सामान्य पातळीवर आणले गेले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 06:08 AM2022-02-05T06:08:01+5:302022-02-05T06:08:36+5:30

Meta: फेसबुकची कंपनी मेटाच्या समभागांमध्ये २६ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाल्याने जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीने बुधवारी मेटाचे रेटिंग कमी केले आहे. हे रेटिंग सामान्य पातळीवर आणले गेले आहे.

The first major blow to the kingdom of Meta, | Meta: मेटाच्या साम्राज्याला प्रथमच मोठा धक्का

Meta: मेटाच्या साम्राज्याला प्रथमच मोठा धक्का

वॉशिंग्टन : फेसबुकची कंपनी मेटाच्या समभागांमध्ये २६ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाल्याने जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीने बुधवारी मेटाचे रेटिंग कमी केले आहे. हे रेटिंग सामान्य पातळीवर आणले गेले आहे. यामुळे फेसबुकच्या १७ वर्षांच्या साम्राज्याला प्रथमच धक्का बसल्याचे मानले जात आहे.
फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम वापरकर्ते मोठ्या प्रमाणात घटल्याने मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्गला मोठा झटका बसला आहे. समभागांमध्ये २६ टक्क्यांची घट झाल्याने त्यांच्या संपत्तीत २.२२ लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

कंपनीच्या जाहिरातींमध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात घट झाली असून, वापरकर्तेही कमी झाल्याने मेटा कंपनीचे समभाग दबावाखाली असण्याची शक्यता आहे, असे जेपी मॉर्गनच्या अहवालात म्हटले आहे. कंपनी स्थापन झाल्यापासूनजेपी मॉर्गनने मेटाची रेटिंग कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मेटाचे समभाग २८४ डॉलरवर येण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)

श्रीमंताच्या यादीतून झुकरबर्ग बाहेर
जेपी मॉर्गनने मेटाची रेटिंग कमी करण्यासह मेटाच्या महसुलामध्येही मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जेपी मॉर्गनसह इतरही तीन कंपन्यांनी मेटाचे रेटिंग कमी केले आहे. समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने मार्क झुकरबर्ग २०१५ नंतरच प्रथमच जगातील प्रमुख १० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले. 

Web Title: The first major blow to the kingdom of Meta,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.