मुंबई - NSE च्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण हिमालयात राहणाऱ्या एका योगींच्या सांगण्यावरून अनेक महत्त्वाचे निर्णय घेत होत्या, अशी माहिती समोर आली आहे. त्यांनी आनंद सुब्रह्मण्यम यांची नियुक्ती एक्सचेंजच्या ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि एमडी अॅडव्हायझर म्हणून केली. मार्केट रेग्युलेटर SEBI च्या एका आदेशामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
सेबीच्या आदेशामध्ये सांगण्यात आले की, रामकृष्णा यांनी सुब्रह्मण्यम यांना अनेकदा मनमानी पद्धतीने पगारवाढ दिली. मात्र त्यांच्या कामगिरीच्या मूल्यांकनाचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही आहे. सेबीकडून शुक्रवारी पास करण्यात आलेल्या ऑर्डरमधून या गोष्टी समोर आल्या आहेत. रेग्युलेटरने रामकृष्ण आणि अन्य व्यक्तींविरोधात ऑर्डर पास केली आहे. ऑर्डरमध्ये सांगितले की, रामकृष्ण यांनी एनएसईच्या काही फायनान्शियल आणि बिझनेस प्लान, डिव्हिडेंटशी संबंधित काही गोष्टी, फायनान्शियल रिझल्ट्स आणि अन्य काही गोपनीय माहिती योगीसोबत शेअर केली. एवढेच एनएसईच्या कर्मचाऱ्यांच्या अप्रायझलबाबत त्यांनी त्यांनी योगींशी विचारविनिमय केला होता.
योगी यांना रामकृष्णा Sironmani च्या रूपात रेफर करू शकतात. तसेच गेल्या २० वर्षांपासून प्रत्येक वैयक्तिक आणि प्रोफेशनल गोष्टींवर त्यांच्या मताच्या आधारावर निर्णय घेत असते. रामकृष्ण एप्रिल २०१३ पासून डिसेंबर २०१६ पासून एनएसईच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ आहेत.
सेबीने आपल्या १९०च्या पेजच्या ऑर्डरमध्ये सांगितले आहे की, रामकृष्णा यांनी योगीच्या सांगण्यावरून सुब्रह्मण्यम यांची नियुक्ती केली. त्यामुळे सुब्रह्मण्यम यांना खूप अधिकार दिले गेले होते. सुब्रह्मण्यम यांना एनएसईमध्ये एप्रिल २०१३ मध्ये चीफ स्ट्रॅटर्जी अॅडव्हायजर म्हणून जॉईन करण्याची ऑफर मिळाली होती. त्यांनी १.६८ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज ऑफर करण्यात आले होते.
गव्हर्नेंसमधील उणिवांवरून सेबीने रामकृष्ण यांच्यावर तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यासह एनएसई, सुब्रह्मण्यम आणि एनएसईचे अन्य माजी एमडी आणि सीईओ रवी नारायण यांच्यावर दोन-दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच रामकृष्ण आमि सुब्रह्मण्यम कुठल्याही मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इंस्टिट्युशन किंवा सेबीसोबत रजिस्टर्ड कुठल्याही इंटरमीडिएटरीसोबत तीन वर्षांपर्यंत असोसिएट होऊ शकत नाहीत. नारायण यांच्यावर या प्रकरणी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.