प्रसाद गो. जोशीआंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढत असलेले कच्चे तेल, रशिया आणि युक्रेन दरम्यानचे युद्ध तसेच चीन आणि अमेरिकेमधील चलनवाढीचे आकडे या बाह्य कारणांबरोबरच देेशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल हे आगामी सप्ताहामध्ये बाजारावर वर्चस्व गाजविणार आहेत. १० मार्च रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यावरून पुढील लोकसभा निवडणुकीची थोडी कल्पना येऊ शकते. त्यामुळे त्यावर बाजाराचे भवितव्य अवलंबून आहे.
दरम्यान, भारतीय बाजारामध्ये परकीय वित्तसंस्थांकडून सातत्याने विक्री सुरूच असल्याचे दिसून येत आहे. गतसप्ताहामध्येही या संस्थांनी मोठी विक्री केली. पीएमआयमध्ये झालेली वाढ समाधानकारक असली तरी अन्य सर्व घटक प्रतिकूल असल्याने बाजार घसरत असलेला दिसत आहे.
सीडीएसएलकडे सहा कोटी डिमॅट खातीसेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) या भारतामधील प्रमुख डिपॉझिटरीकडे सहा कोटी डिमॅट खाती झाली आहेत. देशाच्या लोकसंख्येचा विचार करता यामध्ये अद्यापही बरीच वाढ होण्याची शक्यता असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. नवीन डिमॅट खाती उघडणाऱ्यांमध्ये आता दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांची संख्या वाढती आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदार हे आता केवळ मेट्रो शहरातीलच राहिले नसून, ते अन्य शहरांमधूनही येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे गुंतवणुकीचे प्राधान्यक्रमही बदलताना दिसत आहेत.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घटदरम्यान बाजार खाली गेल्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये ३,१७,६३२.०१ काेटी रुपयांची घट झाली आहे. दरम्यान, बाजारातील पहिल्या १० पैकी ७ कंपन्यांचे भांडवल कमी झाले आहे. रिलायन्स, इन्फोसिस आणि टीसीएस या तीन कंपन्यांचे बाजार भांडवल मात्र वाढलेले दिसून आले.