लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन गेल्या वर्षातील समान कालावधीच्या तुलनेत ११ टक्के वाढून १.४६ लाख कोटी रुपये झाले. जीएसटी संकलन सलग ९ व्या महिन्यात १.४ लाख कोटी रुपयांच्या वर राहिले आहे. मात्र, यंदाच्या ऑगस्टनंतरचे ते सर्वात कमी संकलन ठरले आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमधील जीएसटी संकलन ४ टक्क्यांनी घसरले आहे. ऑक्टोबरमधील जीएसटी संकलन १.५२ लाख कोटी रुपये होते.
नोव्हेंबरमध्ये एकूण जीएसटी संकलन १,४५,८६७ कोटी रुपये राहिले. त्यात केंद्रीय जीएसटी २५,६८१ कोटी, राज्य जीएसटी ३२,६५१ कोटी, एकात्मिक जीएसटी ७७,१०३ कोटी यांचा समावेश आहे. नोव्हेंबर २०२१ मधील संकलन १,३१,५२६ कोटी रुपये होते. या तुलनेत यंदाचे संकलन ११ टक्के अधिक राहिले.
वाहनविक्री सुसाटच
nऑक्टाेबरमधील सणासुदीच्या हंगामानंतरही देशातील वाहन खरेदीची गाडी सुसाट धावत आहे.
nनाेव्हेंबर महिनादेखील जवळपास सर्वच वाहन कंपन्यांसाठी चांगला ठरला असून वाहनविक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ ते ३० टक्के एवढी वाढ झाली आहे.
nविविध कंपन्यांनी नाेव्हेंबरमधील वाहनविक्रीचे आकडे जाहीर करण्यास
सुरुवात केली.
वीजवापर वाढला
देशातील वीजवापरातही वाढ झाली आहे. नाेव्हेंबर महिन्यात ११२.८१ अब्ज युनिट एवढा वीजवापर झाला आहे. गेल्यावर्षी नाेव्हेंबरमध्ये ९९.३२ अब्ज युनिट एवढा वीजवापर हाेता.
इंधनविक्रीतही वाढ
इंधनविक्रीदेखील नाेव्हेंबरमध्ये वाढली आहे. पेट्राेलची २६.६ लाख टन एवढी विक्री झाली. तर डिझेलची विक्री ७३.२ लाख टन एवढी विक्री नाेंदविण्यात आली आहे. काेराेनापूर्व काळापेक्षा ही विक्री जास्त आहे.