Join us  

रशियातून भारतात कच्च्या तेलाची आयात झाली दुप्पट! एप्रिल-जुलै या कालावधीत २०.४५ अरब डॉलरवर पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 3:10 PM

भारतासाठी रशियाकडून आयात दुप्पट झाली आहे आणि एप्रिल-जुलै या कालावधीत २०.४५ अरब डॉलरपर्यंत पोहोचली आहे.

रशियातूनभारतात आयात दुपटीने वाढल्याची माहिती समोर आली आहे. एप्रिल-जुलैमध्ये रशियामधूनभारतात आयात दुप्पट होऊन २०.४५ अब्ज डॉलर झाली आहे, तर एप्रिल-जुलै २०२२ मध्ये रशियाकडून आयात १०.४२ अब्ज डॉलर होती, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली.

भारतातील तिसरे श्रीमंत कोण आहेत माहितेय का? २५८००० कोटी रुपयांची आहे संपत्ती

रशिया-युक्रेन युद्धानंतर, देशाच्या तेल आयातीत रशियाचा वाटा ४० टक्क्यांहून अधिक वाढला.रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी, भारताच्या तेल आयात श्रेणीमध्ये रशियाचा वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी होता, पण आता तो वाढून ४० टक्क्यांहून अधिक झाला आहे. वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कच्चे तेल आणि खतांच्या आयातीत वाढ झाल्यामुळे, रशिया चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते जुलै या कालावधीत भारताचा दुसरा सर्वात मोठा आयात स्रोत बनला आहे. 

आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या चार महिन्यांत रशियाकडून आयात करण्यात आल्याने गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. रशियावर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर भारताला अधिक तेल आयात करण्याची संधी मिळाली.

चीन आणि अमेरिकेनंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाची आयात करणारा देश आहे. युक्रेनवर लष्करी कारवाई केल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले, त्यानंतर भारताला सवलतीच्या दराने कच्च्या तेलाची खरेदी करण्याची संधी मिळाली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जुलै या कालावधीत चीनमधून भारताची आयात ३२.७ अब्ज डॉलरवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत ३४.५५ अब्ज डॉलर होती.

अमेरिकेतून भारताची आयात मागील वर्षीच्या १७.१६ अब्ज डॉलरच्या तुलनेत कमी होऊन १४.२३ अब्ज झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधून आयातही एप्रिल-जुलै २०२३ या कालावधीत १३.३९ अब्ज डॉलर झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत १८.४५ अब्ज डॉलर होती.

निर्यातीच्या आघाडीवर, या कालावधीत भारताच्या पहिल्या १० पैकी सात देशांच्या निर्यातीत घट झाली आहे. यूएस, यूएई, चीन, सिंगापूर, जर्मनी, बांगलादेश आणि इटलीमधील वस्तूंच्या निर्यातीत घट झाली आहे तर यूके, नेदरलँड आणि सौदी अरेबियाच्या निर्यातीत सकारात्मक वाढ झाली आहे.

टॅग्स :रशियाभारत