Lokmat Money > बिझनेस न्यूज > फळांचा राजा करणार खिसा रिकामा, कडक उन्हामुळे उत्पादन अर्ध्याने घटणार; आंबा ४२ टक्के अधिक महाग

फळांचा राजा करणार खिसा रिकामा, कडक उन्हामुळे उत्पादन अर्ध्याने घटणार; आंबा ४२ टक्के अधिक महाग

अत्यंत कडक उन्हाळा आणि काही राज्यांत झालेला अवकाळी पाऊस यामुळे यंदा आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 06:23 AM2022-04-15T06:23:16+5:302022-04-15T06:23:31+5:30

अत्यंत कडक उन्हाळा आणि काही राज्यांत झालेला अवकाळी पाऊस यामुळे यंदा आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

The king of fruits mangos will costlier this year due to the scorching heat the production will be halved Mango is 42 percent more expensive | फळांचा राजा करणार खिसा रिकामा, कडक उन्हामुळे उत्पादन अर्ध्याने घटणार; आंबा ४२ टक्के अधिक महाग

फळांचा राजा करणार खिसा रिकामा, कडक उन्हामुळे उत्पादन अर्ध्याने घटणार; आंबा ४२ टक्के अधिक महाग

नवी दिल्ली :

अत्यंत कडक उन्हाळा आणि काही राज्यांत झालेला अवकाळी पाऊस यामुळे यंदा आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हापूस, दशेरी आणि केशर या प्रमुख तीन जातीच्या आंब्यांचे उत्पादन जवळपास अर्ध्याने कमी होण्याची शक्यता आहे. 

देशातील कृषी बाजारांतील डेटा गोळा करणारे सरकारी पोर्टल ‘ॲगमार्कनेट’ने जारी केलेल्या माहितीनुसार, सध्या आंब्याचे दर गतवर्षाच्या तुलनेत सुमारे ४२ टक्के अधिक आहेत. ठोक बाजारात रत्नागिरी हापूसच्या एका पेटीची (१० किलो) किंमत सरासरी १,२०० ते १,५०० रुपये आहे. गेल्या वर्षी हा दर ७०० ते ८०० रुपये होता.

हापूसचा पुरवठाही ६० टक्क्यांनी घटणार
कोकणचा राजा समजल्या जाणाऱ्या हापूसच्या कोवळ्या फळांचीही मोठ्या प्रमाणात गळ झाली आहे. त्यामुळे यंदा ३५ ते ४० टक्के फळेच हाती लागण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमधील आंबा व्यापाऱ्यांनी सांगितले की, यंदा १ आणि २ डिसेंबर रोजी सतत ३० तास पाऊस झाला. त्यानंतर ८ दिवस जोरदार वारे वाहिले. यात आंब्याचे मोठे नुकसान झाले.

दशेरीला ६०% फटका
उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध दशेरी आंब्याचे उत्पादन यंदा ६० टक्क्यांनी कमी होणार आहे. मँगो ग्रोअर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष इन्सराम अली यांनी सांगितले की, मुदतीपूर्वी आलेल्या प्रचंड उष्णतेमुळे छोटी फळे सुकून गळून गेली आहेत. त्यामुळे उत्पादन अर्ध्यापेक्षाही जास्त घटेल.

गुजरातेतील केसरला फटका
- खराब हवामानामुळे गुजरातेतील केशर आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. गिर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितले की, यंदा केवळ १५ ते २० टक्केच आंबा उत्पादन होईल. 
- कारण ५० ते ६० टक्के झाडांनाच यंदा मोहर आला. तालाला मंडीचे (एपीएमसी) सचिव हरसुखभाई जारसाणिया यांनी सांगितले की, यंदा दोन महिने मोहर राहिला. 
- तथापि, फळे चण्याच्या आकाराएवढी झाल्यानंतर झडून गेली. उत्तर प्रदेशातील आमरायांना उष्णतेचा मोठा फटका बसला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत आंब्याची आवक १० पट कमी आहे. त्यामुळे भाववाढ झाली आहे. 
- घाऊक व्यापारी, दिल्ली 

२७५ ते ३२५ ग्रॅम वजनाच्या हापूसचा भाव सध्या डझनामागे २०० रुपयांनी वाढलेला आहे. 
    - औरंगाबाद व्यावसायिक

Web Title: The king of fruits mangos will costlier this year due to the scorching heat the production will be halved Mango is 42 percent more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा