Join us

LIC Jeevan Labh Plan: एकरकमी मिळणार २० लाख रुपये सोबत अगणित लाभ, अशी आहे एलआयसीची लाभदायक पॉलिसी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 1:06 PM

LIC Jeevan Labh Policy : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीकडून लोकांच्या गरजा विचारात घेऊन वेगवेगळ्या विमा पॉलिसी सुरू केल्या जातात. कंपनीच्या अनेक विमा पॉलिसी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीकडून लोकांच्या गरजा विचारात घेऊन वेगवेगळ्या विमा पॉलिसी सुरू केल्या जातात. कंपनीच्या अनेक विमा पॉलिसी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. यामध्ये एलआयसी जीवन लाभ पॉलिसीचाही समावेश आहे. ही एक एंडोमेंट पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणुकीवर पॉलिसी होल्डरला इन्शोरन्स कव्हरसह सेव्हिंग बेनिफिटसुद्धा मिळते.

देशातील सर्वात मोठी इन्शोरन्स कंपनी असलेल्या एलआयसीने फेब्रुवारी २०२०मध्ये या पॉलिसीची सुरुवात केली होती. ही एक नॉन लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, इंडिव्हुजवल, लाईफ इन्शोरन्स सेव्हिंग पॉलिसी आहे. हा प्लॅन घेतल्यावर पॉलिसी होल्डर्सला प्रोटेक्शनसह अॅट्रॅक्टिव्ह सेव्हिंग फिचर्सही मिळतात.

एलआयसी जीवन लाभ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. तसेच मॅच्युरिटीनंतर जीवित पॉलिसी होल्डरला एकरकमी लाभ दिला जातो. एलआयसीच्या या प्लॅनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला कर्जही घेता येते. या पॉलिसीमध्ये लिक्विडीटीचाही पूर्ण विचार करण्यात आला आहे. कुठलीही व्यक्ती १६ वर्षे, २१ वर्षे आणि २५ वर्षे मॅच्युरिटी अवधीसह या स्किममध्ये गुंतवणूक करता येते. प्रीमियमच्या मॅच्युरिटीचा कालावधी हा १० वर्षे १५ वर्षे आणि १६ वर्षे असा आहे. या स्किममध्ये गुंतवणुकीसाठी प्रीमियमचं पेमेंट मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक असं केलं जाऊ शकतं.

एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार जर कुणी व्यक्ती २० लाख रुपयांच्या सम-इन्शोर्डसोबत ही पॉलिसी घेत असेल, तर त्याला एलआयसी जीवन लाभ योजनेमध्ये दर महिन्याला करासह ७ हजार ९१६ रुपये (दररोज सुमारे २६२ रुपये) गुंतवावे लागतील. या प्रीमियमचा भरणा १६ वर्षांपर्यंत करावे लागेल. तर तुम्हाला मॅच्युरिटीपर्यंत ही पॉलिसी या पॉलिसीला कायम ठेवल्यावर तुम्हाला दोन बोन, मिळू शकतील. बोनस मिळाल्यावर तुम्हाला एकूण ३७ लाख रुपयांपर्यंत मिळू शकतील.

या पॉलिसीमध्ये ८ वर्षांपासून ते ५९ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील कुठलीही व्यक्ती गुंतवणूक करू शकेल. या पॉलिसीमध्ये तुम्हाला किमान दोन लाख रुपयांच्या सम इंन्शोर्डसाठी गुंतवणूक करू शकतात. मात्र त्यासाठी कुठलीही कमाल मर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही. या स्किममध्ये गुंतवणूक केल्यावर प्राप्तिकरामधूनही सवलत मिळते. 

टॅग्स :गुंतवणूकपैसाएलआयसी