Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील 'या' आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचं व्यवस्थापन आता Adani समूहाकडे, सरकारनं दिला लायसन्स

देशातील 'या' आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचं व्यवस्थापन आता Adani समूहाकडे, सरकारनं दिला लायसन्स

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आता अदानी समूहाकडे देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 09:44 PM2022-12-10T21:44:25+5:302022-12-10T21:44:51+5:30

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आता अदानी समूहाकडे देण्यात आली आहे.

The management of guwahati international airport in the country is now with the Adani group the government has given the license | देशातील 'या' आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचं व्यवस्थापन आता Adani समूहाकडे, सरकारनं दिला लायसन्स

देशातील 'या' आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचं व्यवस्थापन आता Adani समूहाकडे, सरकारनं दिला लायसन्स

आसामची राजधानी गुवाहाटी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संपूर्ण व्यवस्थापनाचा परवाना अदानी समूहाला मिळाला आहे. शनिवारी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, एलजीबीआय म्हणजेच लोकप्रिय गोपीनाथ बारडोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी अदानी समूहाला DGCA कडून एरोड्रोम परवाना देण्यात आला आहे. या विमानतळाचे संचालन करणाऱ्या अदानी समूहाच्या गुवाहाटी इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या नावाने परवाना देण्यात आला आहे.

गुवाहाटी इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) शुक्रवारी परवाना दिला आहे. एअरडोम लायसन्सन कन्सेशन ॲग्रीमेंटनुसार लोकप्रिय गोपीनाथ बारडोलोई आंतरराष्ट्रीय (LGBI) विमानतळाचे संपूर्ण व्यवस्थापन, संचालन आणि विकास व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी देण्यात आले आहे.

आत्तापर्यंत गुवाहाटी इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड हे एलजीबीआय एअरपोर्टनुसार त्यांचे ऑपरेटर म्हणून काम करत होते. अदानी समूहाने 8 ऑक्टोबर 2021 रोजी गुवाहाटी विमानतळाचे व्यवस्थापन, संचालन आणि विकास हाती घेतला.

Web Title: The management of guwahati international airport in the country is now with the Adani group the government has given the license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.