प्रसाद गो.जोशी
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह संमिश्र राहिला. चलनवाढीचा दर कमी झाला असला तरी, तो अद्यापही चढाच आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी नफा कमविण्याचे धोरण स्वीकारलेले दिसून आले. परिणामी बाजार काहीसा खाली येऊन बंद झाला. आगामी सप्ताहात देशांतर्गत पातळीवर कोणतेही मोठे निर्णय होण्याची शक्यता दिसत नाही. एफ अँड ओ व्यवहारांची मासिक सौदापूर्ती असल्याने बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात फेडरल रिझव्र्हच्या बैठकीत झालेल्या चर्चेचा गोषवारा जाहीर होईल. त्यापासून बाजार वर खाली होऊ शकतो. तेलाच्या किमती आणि डॉलर रुपयाच्या विनिमय दरातील फरक या बाबी महत्त्वाच्या ठरणार असून त्याच बाजारासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
देशांतर्गत संस्थांकडून खरेदीगेले दोन सप्ताह विक्री करीत असलेल्या देशांतर्गत वित्तीय संस्थांनी गत सप्ताहात खरेदी केली. पहिल्या दहा पैकी आठ कंपन्यांच्या भांडवल मूल्यात वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजने आपले स्थान कायम राखले असले तरी तिचे भांडवल मूल्य मात्र कमी झाले आहे. भांडवलमूल्य वाढलेल्या आठ कंपन्यांनी मूल्यांमध्ये एकूण ४२,१७३.४२ कोटींची वाढ झाली.