Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजाराचा सार्वकालिक उच्चांक; सेन्सेक्सने ७३ हजारांचा, तर निफ्टीने २२ हजारांचा टप्पा केला पार

बाजाराचा सार्वकालिक उच्चांक; सेन्सेक्सने ७३ हजारांचा, तर निफ्टीने २२ हजारांचा टप्पा केला पार

दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने ७३,२८८  अंकांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता, तर निफ्टीही २२,०८१ अंशांपर्यंत पोहोचला होता. सेन्सेक्समध्ये ६०० अंकांची, तर निफ्टीमध्ये १६० अंकांची तेजी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 06:25 AM2024-01-16T06:25:33+5:302024-01-16T06:25:58+5:30

दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने ७३,२८८  अंकांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता, तर निफ्टीही २२,०८१ अंशांपर्यंत पोहोचला होता. सेन्सेक्समध्ये ६०० अंकांची, तर निफ्टीमध्ये १६० अंकांची तेजी दिसून आली.

the market's all-time high; Sensex crossed 73 thousand and Nifty crossed 22 thousand | बाजाराचा सार्वकालिक उच्चांक; सेन्सेक्सने ७३ हजारांचा, तर निफ्टीने २२ हजारांचा टप्पा केला पार

बाजाराचा सार्वकालिक उच्चांक; सेन्सेक्सने ७३ हजारांचा, तर निफ्टीने २२ हजारांचा टप्पा केला पार

मुंबई : संपूर्ण देशभरात थंडीमुळे हुडहुडी वाढत असतानाच शेअर बाजाराने मात्र गुंतवणूकदारांचा खिसा चांगलाच गरम केला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सने ७३ हजारांचा, तर निफ्टीने २२ हजारांचा टप्पा पार केला आहे. 
दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने ७३,२८८  अंकांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता, तर निफ्टीही २२,०८१ अंशांपर्यंत पोहोचला होता. सेन्सेक्समध्ये ६०० अंकांची, तर निफ्टीमध्ये १६० अंकांची तेजी दिसून आली.

कोणते शेअर घसरले?
शेअर बाजारात व्यवहारांना सुरुवात होताच जवळपास २,१६० समभागांमध्ये वृद्धी दिसून आली तर ४३७ समभागांमध्ये घसरण झाली. ११६ समभागांमध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. 
विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी, टेक महिंद्रा, एलटीआय माईंडट्री आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वृद्धी झाली. एचडीएफसी लाइफ, आयशर मोटर्स, एचयूएल, हिंडोल्को आणि आयसीआयसीआय बँक यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

Web Title: the market's all-time high; Sensex crossed 73 thousand and Nifty crossed 22 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.