Join us

अमेरिकेत राहण्यासाठी दरमहा किती खर्च होतो? सर्वात महागडं शहर कोणतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:32 IST

Affordable Cities in USA : अनेक भारतीय अमेरिकेत राहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून घुसखोरी करण्याचीही त्यांची तयारी असते. पण, तिथे राहायला दरमहा किती खर्च येतो माहिती आहे का?

Affordable Cities in USA : डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर भारताविरुद्ध आक्रमक भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या भारतीय नागरिकांना लष्करी विमानाने मायदेशी आणून सोडण्यात आले. गेल्या काही वर्षात लाखो भारतीयांनी गैरमार्गाने यूएसमध्ये घुसखोरी केली आहे. परंतु, अमेरिकेत राहणे म्हणजे मुंबई-पुण्यात राहण्याइतके स्वस्त नक्कीच नाही. यूएसमध्ये महिन्याला किती पैसे खर्च होतात माहिती आहे का?

अमेरिकत राहायला महिन्याचा खर्च किती?भारताप्रमाणेच अमेरिकेतही शहरानुसार राहण्याचा खर्च कमी अधिक होतो. ही किंमत अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यांवर अवलंबून आहे. जर तुम्ही आज अमेरिकेत एकटे राहात असाल तर तुमचा सरासरी मासिक खर्च २८०० ते ३२०० डॉलर इतका असेल. भारतीय चलनात सांगायचं झालं तर तुम्हाला दरमहा सुमारे २.४३ लाख ते २.७७ लाख रुपये लागतील. इतक्या खर्चात तुम्ही अमेरिकेत सामान्य जीवन जगू शकता. जर तुम्ही भारतात इतका खर्च केला तर तुम्ही विलासी जीवन जगू शकता. असे असले तरी अमेरिकेच्या मानाने हा खर्च खूप वाटत नाही. कारण, अमेरिकेत किमान वेतन भारताच्या तुलनेत खूप जास्त आहे.

अमेरिकेतील कोणत्या शहरात राहणे सर्वाधिक महाग?अमेरिकेतील न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया यांसारख्या ठिकाणी तुम्हाला साधे जीवन जगण्यासाठी आणखी पैसे खर्च करावे लागतील. या ठिकाणी राहण्याचा सरासरी खर्च ३५०० डॉलर्स म्हणजेच ३ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेत राहणारे बहुतेक भारतीय नोकरी करतात. याशिवाय अनेक भारतीयही इथे छोटे-मोठे व्यवसाय करत आहेत. तर काहीजण मोठे व्यावसायिक देखील आहेत. यासोबतच अनेक भारतीय अमेरिकेसह इतर देशांतील कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत.

पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरडोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच अनेक देशांवर आणि वस्तूंवर आयात शुल्क लादले आहेत. याचा फटका भारतालाही बसला आहे. तर दुसरीकडे घुसखोर भारतीय नागरिकांविरुद्धही अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली. अशी परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी महत्त्वाच्या चर्चेसाठी २ दिवसीय वॉशिंग्टन दौऱ्यावर पोहोचले आहेत. भारतीय नागरिकांना देशाबाहेर काढणे, आयात शुल्क लादणं यावर पंतप्रधान मोदी कशी भूमिका मांडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :अमेरिकाअमेरिकापैसा