Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्ज काढून सण साजरे करणारे झाले दुप्पट, वैयक्तिक कर्जदारांच्या संख्येत मोठी वाढ

कर्ज काढून सण साजरे करणारे झाले दुप्पट, वैयक्तिक कर्जदारांच्या संख्येत मोठी वाढ

ग्राहकांच्या पतविषयक वर्तनाचा माग घेणारी संस्था ‘क्रिफ हाय मार्क’च्या अहवालात म्हटले आहे की, गत वर्षातील डिसेंबर तिमाहीत ग्राहकांकडून १.४७ लाख कोटींचे वैयक्तिक कर्ज घेण्यात आले असून, जे डिसेंबर २०१८च्या तिमाहीत नोंदण्यात आलेल्या ७५ हजार कोटींच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 01:42 PM2022-04-23T13:42:01+5:302022-04-23T13:42:39+5:30

ग्राहकांच्या पतविषयक वर्तनाचा माग घेणारी संस्था ‘क्रिफ हाय मार्क’च्या अहवालात म्हटले आहे की, गत वर्षातील डिसेंबर तिमाहीत ग्राहकांकडून १.४७ लाख कोटींचे वैयक्तिक कर्ज घेण्यात आले असून, जे डिसेंबर २०१८च्या तिमाहीत नोंदण्यात आलेल्या ७५ हजार कोटींच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. 

The number of borrowers has doubled, with a huge increase in the number of customers taking personal loans | कर्ज काढून सण साजरे करणारे झाले दुप्पट, वैयक्तिक कर्जदारांच्या संख्येत मोठी वाढ

कर्ज काढून सण साजरे करणारे झाले दुप्पट, वैयक्तिक कर्जदारांच्या संख्येत मोठी वाढ

मुंबई : कर्ज काढून सण साजरे करू नये, अशी म्हण अनेक वर्षांपासून पुढच्या पिढीला शिकवली जाते. मात्र  कोरोनामुळे रोजगार गेल्याने गेल्या ३ वर्षांत कर्ज काढून सण साजरे करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. २०२१ च्या सणासुदीच्या काळात वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांची संख्या तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. 

पर्सनल लोन घेणारे ग्राहक वाढले असले तरी कोरोनामुळे कर्ज फेडू न शकणारे ग्राहकही वाढले आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत १६,३९३ कोटी रुपयांवरून दुचाकी कर्जाची आकडेवारी १५,२८१ कोटी रुपयांवर घसरली आहे, असेही अहवालात म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या डिसेंबर तिमाहीत, २०१८-१९ च्या याच तिमाहीच्या तुलनेत गृह कर्जाचा आकडा ४० टक्क्यांनी वाढून १.९३ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

यासाठी काढले गेले कर्ज...
वैयक्तिक कर्ज -

- १.४७ लाख कोटी २०२१ (डिसेंबर तिमाही)  
- ७५ हजार कोटी २०१८ (डिसेंबर तिमाही)

दुचाकींसाठी कर्ज -
- १५,२८१ कोटी २०२१ (डिसेंबर तिमाही)  
- १६,३९३ कोटी २०१८ (डिसेंबर तिमाही)

घरातील वस्तूंच्या खरेदीसाठी कर्ज
- २६,०७५ कोटी २०२१ (डिसेंबर तिमाही)  
- १९,६८३ कोटी २०१८ (डिसेंबर तिमाही)

अहवाल काय सांगतो...
ग्राहकांच्या पतविषयक वर्तनाचा माग घेणारी संस्था ‘क्रिफ हाय मार्क’च्या अहवालात म्हटले आहे की, गत वर्षातील डिसेंबर तिमाहीत ग्राहकांकडून १.४७ लाख कोटींचे वैयक्तिक कर्ज घेण्यात आले असून, जे डिसेंबर २०१८च्या तिमाहीत नोंदण्यात आलेल्या ७५ हजार कोटींच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. 

गृहकर्ज -
१.९३ लाख कोटी २०२१ (डिसेंबर तिमाही)  ४०% वाढ
 
Web Title: The number of borrowers has doubled, with a huge increase in the number of customers taking personal loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.