नवी दिल्ली : बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने सध्या तरुणांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकताच याचा प्रत्यय बिहारमधील रेल्वे परीक्षेदरम्यान झालेल्या गोंधळामुळे समोर आला. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी-सीएमआयई’ या संस्थेने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर ते डिसेंबर २०२१ दरम्यान देशातील बेरोजगारांची संख्या ३.१८ कोटींवर पोहोचली आहे. ही संख्या २०२० च्या देशभरात लादण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीपेक्षा अधिक आहे.
बेरोजगार झालेल्यांमध्ये प्रामुख्याने पदवीधारकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अर्थव्यवस्था म्हणाव्या तितक्या वेगाने आणि सर्वसमावेशक वाढली नाही, हे बेरोजगारीचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे. बांधकाम, पर्यटन, आदरातिथ्य यांसारख्या क्षेत्रांची वाढ ही अर्थव्यवस्थेच्या तुलनेत अतिशय कमी गतीने होत आहे. त्याचा फटका बसत आहे.
४ वर्षांत १.२६ कोटी
तरुण बेरोजगारांमध्ये वाढ
वय सप्टेंबर ते लॉकडाऊन मे
डिसेंबर-२०२१ ते ॲागस्ट २०२०
१५ ते १९ ४०.१३ लाख ३०.२५ लाख
२० ते २४ २.०३ कोटी १.८१ कोटी
२५ ते २९ ६०.६९ लाख ८१.२७ लाख
तरुण बेरोजगार ३.०३ कोटी २.९१ कोटी
तरुणांनी आता नोकरी शोधणेच सोडून दिले
कमी शिकलेले तरुण लहान मोठे काम करणे सुरू करतात. मात्र पदवीधर तरुण आपल्या शिक्षणायोग्य नोकरी पाहतात. मात्र नवीन नोकऱ्याच निर्माण होत नसल्याने तरुण बेरोजगार होत आहेत. खूप महिन्यांपासून नोकरी शोधूनही ती मिळत नसल्याने अनेकांनी नाराज होत आता नोकरी शोधणेच थांबविले आहे.
३७ हजार जागांसाठी १.२५ कोटी अर्ज
nरेल्वेभरतीच्या परीक्षेसाठी जवळपास ३७ हजार जागा होत्या. मात्र १.२५ कोटी अर्ज आले होते. यावरूनच देशात बेरोजगारी किती वाढली आहे, याचा अंदाज घेता येतो.
पदवीधारकांना सर्वाधिक
फटका (टक्क्यांमध्ये)
शिक्षण डिसेंबर-२१ डिसेंबर-१७
५ वी ०.७ ०.९
सहावी ते ९वी १.५ ३.०
१० वी ते १२वी १०.३ ७.३
पदवीधर १९.४ ११.९