Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुलाबी नोट अजून घरीच; काय होईल ५ दिवसांनी?

गुलाबी नोट अजून घरीच; काय होईल ५ दिवसांनी?

२४,००० कोटींच्या नोटा परतल्या नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 08:57 AM2023-09-26T08:57:37+5:302023-09-26T08:58:40+5:30

२४,००० कोटींच्या नोटा परतल्या नाहीत

The pink note is still at home; What will happen after 5 days? | गुलाबी नोट अजून घरीच; काय होईल ५ दिवसांनी?

गुलाबी नोट अजून घरीच; काय होईल ५ दिवसांनी?

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : सर्वाधिक मूल्य असलेली दोन हजारांची नोट बँकांमध्ये जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी शेवटचे पाच दिवस म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत शिल्लक उरली आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, अजूनही २४,००० कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा बँकांमध्ये परतलेल्या नाहीत. ही मुदत आणखी वाढविली जाणार नाही; परंतु, यासाठी विशेष सुविधा सुरू केली जाईल, अशी माहिती आरबीआयमधील सूत्रांनी दिली. 
आरबीआयने १९ मे रोजी ही नोट चलनातून मागे घेण्याबाबत घोषणा केली होती. यानंतर सोनेखरेदीत चांगलीच वाढ झाल्याचे दिसले. मुदतीनंतर ही नोट चलनात राहील; परंतु व्यवहारात वापरता येणार नाही. रिझर्व्ह बॅंकेत ती बदलून मिळेल.

१ सप्टेंबरपर्यंत ७ टक्के नोटा होत्या चलनात
nनोटबंदीनंतर बाजारात एकूण ३.५६ लाख कोटींच्या रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा चलनात होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये दोन हजारांची नोट आली. नोटाबंदी निर्णयानंतर एक हजार आणि पाचशेच्या नोटांवर बंदी घातली होती. 
nभ्रष्टाचार व काळापैशावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेतला होता. १ सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या ७ टक्के नोटा चलनात होत्या.

Web Title: The pink note is still at home; What will happen after 5 days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.