Lokmat Money > बिझनेस न्यूज > थाळी होती स्वस्त, खाल्ली का? बटाटे, टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचा परिणाम, नोव्हेंबरमध्ये महागणार

थाळी होती स्वस्त, खाल्ली का? बटाटे, टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचा परिणाम, नोव्हेंबरमध्ये महागणार

ऑक्टोबर २०२३ मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाच्या थाळ्या स्वस्त झाल्या आहेत, असे क्रिसिलच्या एका अहवालात म्हटले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 09:03 AM2023-11-09T09:03:53+5:302023-11-09T09:05:11+5:30

ऑक्टोबर २०२३ मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाच्या थाळ्या स्वस्त झाल्या आहेत, असे क्रिसिलच्या एका अहवालात म्हटले आहे. 

The plate was cheap, did you eat it? Potatoes, a result of the drop in tomato prices, will be expensive in November | थाळी होती स्वस्त, खाल्ली का? बटाटे, टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचा परिणाम, नोव्हेंबरमध्ये महागणार

थाळी होती स्वस्त, खाल्ली का? बटाटे, टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचा परिणाम, नोव्हेंबरमध्ये महागणार

नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाच्या थाळ्या स्वस्त झाल्या आहेत, असे क्रिसिलच्या एका अहवालात म्हटले आहे. 

बटाटे आणि टोमॅटोच्या दरात अनुक्रमे २१ टक्के आणि ३८ टक्के घसरण झाल्यामुळे शाकाहारी थाळी स्वस्त झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात मात्र दोन्ही प्रकारच्या थाळ्यांच्या किमती वाढू शकतात, असे क्रिसिलने नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी महाग झालेले टोमॅटो आणि बटाटे यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले होते. कंपन्यांनी पदार्थांमध्ये टोमॅटोंचा वापरही बंद केला होता. 

या महिन्यात होणार महाग?
क्रिसिलने आपल्या अहवालात म्हटले की, नोव्हेंबरमध्ये थाळ्यांच्या किमती वाढू शकतात. नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहात कांद्याच्या किमती आदल्या महिन्याच्या तुलनेत ७५ टक्के वाढल्या आहेत. 

...पुन्हा वांदा?
अहवालात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०२३ च्या दुसऱ्या सप्ताहात कांद्याच्या किमती वाढल्यामुळे शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही थाळ्यांच्या किमती कमी होण्यास मर्यादा आल्या. 
ऑक्टोबरच्या पहिल्या सप्ताहात सरासरी ३४ रुपये किलो असलेला कांदा दुसऱ्या सप्ताहात ४० रुपये किलो झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ १९ टक्के आहे. शाकाहारी थाळीच्या खर्चात कांद्याचा वाटा ९ ते १० टक्के आहे. 

२७.५० रुपये
ऑक्टोबर २०२३ मध्ये शाकाहारी थाळी मिळत होती. क्रिसिलच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ती २९ रुपये होती. सप्टेंबरमध्ये किंमत २७.९० रुपये होती. 

५८.४० रुपये
ऑक्टोबर २०२३ मध्ये मांसाहारी थाळी मिळत होती. क्रिसिलच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी याच महिन्यात ती ६२.७० रुपये होती. सप्टेंबर २०२३ मध्ये ती ६०.५० रुपये होती.

इंधनखर्चही झाला कमी 
- इंधन खर्चात कपातक्रिसिलने म्हटले की, इंधन खर्चात १४% कपात झाल्यामुळे शाकाहारी व मांसाहारी थाळ्यांच्या किमतीत कपात होण्यास मदत झाली आहे. 
- शाकाहारी व मांसाहारी थाळीच्या खर्चात इंधन खर्चाचा वाटा अनुक्रमे १४ टक्के व ८ टक्के आहे. १४.२ किलो वजनाच्या सिलिंडरची किंमत घसरून ९०३ रुपये झाली. 

Web Title: The plate was cheap, did you eat it? Potatoes, a result of the drop in tomato prices, will be expensive in November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.