Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Cylinder ची कटकट संपली, आता फ्रीमध्ये तयार होणार स्वयंपाक; सरकारनं आणली नवीन पद्धत!

LPG Cylinder ची कटकट संपली, आता फ्रीमध्ये तयार होणार स्वयंपाक; सरकारनं आणली नवीन पद्धत!

देशभरात स्वयंपाकाच्या गॅस दरात झपाट्याने वाढ होत असताना, लोक आता स्वयंपाकासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. हे लक्षात घेत सरकारने स्वयंपाकासाठी नवी पद्धत आणली आहे. याद्वारे आपण अगदी कमी खर्चात अथवा मोफत स्वयंपाक बनवू शकता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 06:55 PM2023-05-11T18:55:42+5:302023-05-11T18:56:10+5:30

देशभरात स्वयंपाकाच्या गॅस दरात झपाट्याने वाढ होत असताना, लोक आता स्वयंपाकासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. हे लक्षात घेत सरकारने स्वयंपाकासाठी नवी पद्धत आणली आहे. याद्वारे आपण अगदी कमी खर्चात अथवा मोफत स्वयंपाक बनवू शकता. 

The plot to buy LPG Cylinder is over, now cooking will be done for free; The government brought a new method! | LPG Cylinder ची कटकट संपली, आता फ्रीमध्ये तयार होणार स्वयंपाक; सरकारनं आणली नवीन पद्धत!

LPG Cylinder ची कटकट संपली, आता फ्रीमध्ये तयार होणार स्वयंपाक; सरकारनं आणली नवीन पद्धत!

जर आपण महागड्या गॅस सिलिंडरमुळे त्रस्त असाल, तर आता आपल्याला मुळीच टेन्शन घेण्याची गरज नाही. आता आपण मोफत स्वयंपाक तयार करू शकता. अर्थात आपल्याला स्वयंपाकासाठी आता एलपीजी सिलिंडरची (LPG Cylinder) आवश्यकता नाही. देशभरात स्वयंपाकाच्या गॅस दरात झपाट्याने वाढ होत असताना, लोक आता स्वयंपाकासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. हे लक्षात घेत सरकारने स्वयंपाकासाठी नवी पद्धत आणली आहे. याद्वारे आपण अगदी कमी खर्चात अथवा मोफत स्वयंपाक बनवू शकता. 

सरकारने आणली नवी पद्धत - 
केंद्र सरकारने एक नवीन सोलार स्टोव्ह आणला आहे. याद्वारे आपण एलपीजी सिलिंडरशिवाय स्वयंपाक करू शकता. हा सोलार स्टोव्ह सूर्यप्रकाशावर काम करतो. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

IOCL ने लॉन्च केली नवी सुविधा -
देशातील सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल लिमिटेडने एक खास डिव्हाईस लॉन्च करण्यात आले आहे. याच्या माध्यमाने आपण गॅस शिवाय स्वयंपाक तयार करू शकता. इंडियन ऑइलने (IOCL) एक सोलर स्टोव्ह सूर्य नूतन (Surya Nutan) लॉन्च केला आहे. हा सोलर स्टोव्ह इंडियन ऑईलच्या संशोधन आणि विकास केंद्र, फरीदाबादने की तयार केला आहे.

किती असेल किंमत - 
या सोलार स्टोव्हची किंमत 12,000 रुपये एवढी आहे. तसेच, याच्या टॉप मॉडेलची किंमत 23,000 रुपये एवढी आहे. हा स्टोव्ह खरेदी करण्यासाठी आपल्याला केवळ एकदाच पैसे लागतील. मात्र यानंतर आपल्या पैशांची बचत होऊ शकते. कारण यानंत आपल्याला गॅस सिलिंडर भरण्याची गरज पडणार नाही.

पाहा ऑफिशिअल लिंक -
या सोलार स्टोव्ह संदर्भात अधिक माहितीसाठी आपण https://iocl.com/pages/SuryaNutan या ऑफिशियल लिंकला व्हिजिट करू शकता.

केबलच्या माध्यमाने वापरता येईल -
हा सोलार स्टोव्ह आपल्याला स्वयंपाकघरात ठेवावा लागेल. याला एक केबल असेल. जे छतावरील सोलार प्लेटला जोडलेली असेल. हे केबल सौर प्लेटद्वारे निर्माण होणारी ऊर्जा स्टोव्हपर्यंत पोहोचवेल.

Web Title: The plot to buy LPG Cylinder is over, now cooking will be done for free; The government brought a new method!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.