Lokmat Money > बिझनेस न्यूज > खिसा रिकामा तर होणार नाही ना? आज कळणार

खिसा रिकामा तर होणार नाही ना? आज कळणार

नागरिकांच्या कर्जाचे मासिक हप्ते वाढणार की, आहे तसेच कायम राहणार याचा निकाल उद्या येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 06:43 AM2023-10-06T06:43:13+5:302023-10-06T06:43:28+5:30

नागरिकांच्या कर्जाचे मासिक हप्ते वाढणार की, आहे तसेच कायम राहणार याचा निकाल उद्या येईल.

The pocket will not be empty, will it? Will know today | खिसा रिकामा तर होणार नाही ना? आज कळणार

खिसा रिकामा तर होणार नाही ना? आज कळणार

कोलकाता :भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयाची घोषणा शुक्रवार, ६ ऑक्टोबर रोजी होईल. त्यामुळे नागरिकांच्या कर्जाचे मासिक हप्ते वाढणार की, आहे तसेच कायम राहणार याचा निकाल उद्या येईल.

एमपीसी बैठकीला बुधवारी प्रारंभ झाला होता. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे बैठकीतील निर्णय शुक्रवारी सकाळी जाहीर करतील. रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. ऑगस्टमधील बैठक आणि आताची बैठक यांच्या मधल्या काळात महागाई वाढली आहे. वाढही मजबूत आहे. जागतिक मानके थोडेसे प्रतिकूल आहेत. त्यामुळे अमेरिकी फेडरल रिझर्व्ह आपला आक्रमक पवित्रा कायम राखून आहे. मात्र, ऑगस्टनंतर कृषी उत्पादनाच्या किमती कमी झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Web Title: The pocket will not be empty, will it? Will know today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.