Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता धूसर; स्वस्त तेलाचा फायदा घटला, वाहतूक महाग

पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता धूसर; स्वस्त तेलाचा फायदा घटला, वाहतूक महाग

रशियावर अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी कच्च्या तेलाच्या विक्रीवर निर्बंध लावले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 09:48 AM2023-07-11T09:48:48+5:302023-07-11T09:49:35+5:30

रशियावर अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी कच्च्या तेलाच्या विक्रीवर निर्बंध लावले आहेत

The possibility of petrol-diesel becoming cheaper is bleak; Benefit of cheap oil reduced, transportation expensive | पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता धूसर; स्वस्त तेलाचा फायदा घटला, वाहतूक महाग

पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता धूसर; स्वस्त तेलाचा फायदा घटला, वाहतूक महाग

नवी दिल्ली: युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताला रशियाकडून अतिशय स्वस्त दरात कच्चे तेल मिळत होते. मात्र, आता ही सवलत अप्रत्यक्षरित्या घटली असून केवळ ४ डॉलर प्रति बॅरल एवढाच फायदा भारताला होत आहे. तेलाची वाहतूक महागल्यामुळे हा परिणाम झाला आहे. मात्र, त्यामुळे पेट्रोल व डिझेल स्वस्त होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

रशियावर अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी कच्च्या तेलाच्या विक्रीवर निर्बंध लावले आहेत. तसेच ६० डॉलर प्रति बॅरल दरमर्यादा निश्चित केली आहे. भारताला सरासरी सुमारे ८ ते १० डॉलर प्रति बॅरलपेक्षाही कमी दराने कच्चे तेल मिळत आहे.

असा पडला फरक...

३० डॉलर प्रति बॅरल एवढी सूट गेल्यावर्षी भारताला मिळत होती. ११ ते १९ डॉलर प्रति बॅरल खर्च कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी लागत आहे. कच्च्या तेलाच्या एकूण आयातीच्या ४४% खरेदी भारत रशियाकडून करीत आहे

Web Title: The possibility of petrol-diesel becoming cheaper is bleak; Benefit of cheap oil reduced, transportation expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.