Join us

पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता धूसर; स्वस्त तेलाचा फायदा घटला, वाहतूक महाग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 9:48 AM

रशियावर अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी कच्च्या तेलाच्या विक्रीवर निर्बंध लावले आहेत

नवी दिल्ली: युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताला रशियाकडून अतिशय स्वस्त दरात कच्चे तेल मिळत होते. मात्र, आता ही सवलत अप्रत्यक्षरित्या घटली असून केवळ ४ डॉलर प्रति बॅरल एवढाच फायदा भारताला होत आहे. तेलाची वाहतूक महागल्यामुळे हा परिणाम झाला आहे. मात्र, त्यामुळे पेट्रोल व डिझेल स्वस्त होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

रशियावर अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी कच्च्या तेलाच्या विक्रीवर निर्बंध लावले आहेत. तसेच ६० डॉलर प्रति बॅरल दरमर्यादा निश्चित केली आहे. भारताला सरासरी सुमारे ८ ते १० डॉलर प्रति बॅरलपेक्षाही कमी दराने कच्चे तेल मिळत आहे.

असा पडला फरक...

३० डॉलर प्रति बॅरल एवढी सूट गेल्यावर्षी भारताला मिळत होती. ११ ते १९ डॉलर प्रति बॅरल खर्च कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी लागत आहे. कच्च्या तेलाच्या एकूण आयातीच्या ४४% खरेदी भारत रशियाकडून करीत आहे

टॅग्स :पेट्रोल